Mi Savitribai Jyotirao Phule: इतिहास, परंपरा आणि भावना; सावित्री-जोतीरावांच्या विवाहातून उलगडणार ऐतिहासिक पर्व
Saam TV February 04, 2026 12:45 AM

Mi Savitribai Jyotirao Phule Marathi Serial: स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. समाजप्रबोधन, स्त्रीशिक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारी ही मालिका प्रत्येक भागातून प्रेक्षकांना भावनिकरीत्या जोडून ठेवत आहे. आता या मालिकेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांच्या जीवनातील अत्यंत खास असा विवाहसोहळा लवकरच मालिकेत दाखवण्यात येणार असून, या प्रसंगाकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

हा विवाहसोहळा केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्याचा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. त्यामुळेच मालिकेच्या निर्मात्यांनी या सोहळ्याची मांडणी अत्यंत भव्य, भावपूर्ण आणि काळाच्या पार्श्वभूमीला साजेशी केली आहे. परंपरा, संस्कार आणि संस्कृती यांचा सन्मान राखत सावित्रीबाई आणि जोतीरावांचा विवाहसोहळा सादर केला जाणार आहे.

Dhurandhar 2 Teaser: लियारीमध्ये हमजाची हुकूमत..; रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2'चा धमाकेदार टिझर रिलीज

खंडोबाला लगीनचिठ्ठी अर्पण करण्याची मंगल परंपरा, मुहूर्तमेढ रोवण्याचा विधी, हळदीचा मंगल समारंभ, चुडा भरण्याचा हळुवार सोहळा अशा प्रत्येक रितीरिवाजाचं अत्यंत बारकाईने चित्रण करण्यात आलं आहे. त्या काळातील दागिने, साड्या आणि विवाहातील प्रत्येक विधीमागील सांस्कृतिक व भावनिक महत्त्वही मालिकेत ठळकपणे अधोरेखित केलं जाणार आहे. या सगळ्या प्रसंगांतून त्या काळातील सामाजिक परिस्थिती आणि सावित्रीबाई-जोतीरावांच्या विचारांची उंची प्रेक्षकांना जाणवेल.

Gopichand Padalkar New Song: 'आमच्या नादाला लागण्याआधी...'; भाजप आमदाराच्या गाण्याने सोशल मीडियात कल्ला
View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)