लवळे शाळेची लेखाधिकाऱ्यांकडून पाहणी
esakal February 07, 2026 09:45 AM

पिरंगुट, ता. ६ : लवळे (ता. मुळशी) येथील पीएमश्री जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी विशाल पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत या शाळेतील पाहणी करून पवार यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांनी गावातील शिक्षण आणि पायाभूत सुविधा, डिजिटल शाळा, ई- लर्निंग सुविधा, ग्रंथालये आणि कौशल्य प्रशिक्षण शिक्षण आदींची पाहणी केली. शाळेतील परसबाग, कोडिंग, अलेक्सा, जर्मन भाषा, वाचनालय, प्रयोगशाळा, खगोलीय प्रयोगशाळा आदी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.
गावांतील मुलांसाठी दर्जेदार शिक्षण व आधुनिक पायाभूत सुविधा उंचावणे, यासाठी ग्रामपंचायतीने केलेले प्रयत्न पाहून समाधान पवार यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायतीने, तसेच शासनाने दिलेल्या सुविधांचा वापर शाळेत चांगल्या प्रकारे होत आहे व त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे. हे पाहून सर्व अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी इस्रो येथे भेट देऊन आलेल्या सातवीच्या वैष्णवी निकाळजे हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुळशी पंचायत समितीचे तालुका गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी संग्राम पाटील, माजी गटशिक्षण अधिकारी दत्तात्रेय भालेराव, केंद्रप्रमुख सुनील वाल्हेकर, ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल साकोरे, मुख्याध्यापक नंदा खोमणे आदी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.