मेढ्यात पोलिसांचे संचलन
कास, ता. ६ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेढा शहरात पोलिस संचलन करण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना केल्या. संचलनात सुधीर पाटील यांच्यासह आठ पोलिस अधिकारी, १४८ पोलिस अंमलदार व ५० होमगार्ड सहभागी होते.
निवडणूक कामात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत मेढा पोलिस सज्ज असून, कोणीही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा सुधीर पाटील यांनी दिला.
फोटो
०४५१५
मेढा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचलन करताना मेढा पोलिस ठाण्याचे कर्मचारी. (अर्चना पवार : सकाळ छायाचित्रसेवा)