छत्रपती संभाजी नगर : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण 7,438 उमेदवार रिंगणात असून 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, ठिकठिकाणी मतदानाला चांगला प्रतिसाद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारानं राडा केला आहे. भाजपच्या बुथवर जाऊन तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. बजाज नगर येथील केंद्राच्या अवघ्या 200 मीटर परिसरावर हा तुफान गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारानं राडा केला आहे. भाजपच्या बुथवर जाऊन तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. 40 ते 50 कार्यकर्त्यांसह भाजप पुरस्कृत उमेदवाराच्या बुथवर जाऊन धमकी आणि दमदाटी केली आहे. अनिल चोरडिया असे ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचे नाव आहे. महिलांनाही दमदाटी आरेरावी केली आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
दरम्यान, राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज (7 फेब्रुवारी) मतदान पार पडत आहे. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7 हजार 438 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2 हजार 624 तर पंचायत समितीसाठी 4 हजार 814 उमेदवार मैदानात उतरले आहेत. या सगळ्यांचं भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे. आज सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच दरम्यान ही मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक आयोगाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी सध्या सुरु आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानानंतर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुकारण्यात आलेल्या दुखवट्यामुळे या निवडणुका 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलाय. त्या अनुषंगाने आज मतदानाची रणधुमाळी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादित असलेल्या रायगड, रत्नागिरीसिंधुदुर्ग, पुणेसातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार या सर्व ठिकाणी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्या अनुषंगाने आज मतदानाची रणधुमाळी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा