माझं निलंबन हा छोटा मुद्दा! जनतेच्या प्रश्नासाठी फासावर चढवलं तरी मी तयार, काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंचा सरकारवर हल्लाबोल 
प्रशांत देसाई February 08, 2026 02:43 AM

Prashant Padole : लोकसभा सभागृहात कुठलाही खासदार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न मांडत नाही. तर, जनतेचे प्रश्न ते मांडतात. जनतेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केला असता आमच्यावर कागद फाडण्याचा आरोप होत आहे. मात्र, भाजपचे नेते सभागृहात अनपार्लमेंटरी शब्दाचा वापर करतात. सभागृहाचा इतिहास बघा, रेकॉर्ड बघा. मात्र, त्यांच्यावर कुठलीही कारवाई कधीही झालेली नाही, असे मत लोकसभेत निलंबित करण्यात आलेले काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर देखील टीका केली. माझं निलंबन हा छोटा मुद्दा आहे. पण जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवल्याप्रकरणी फासावर चढवलं तरी मी तयार असल्याचे मत पडोळे यांनी व्यक्त केले. 

विरोधकांना सभागृहात बोलू दिलं जात नाही

विरोधकांना सभागृहात बोलू दिलं जात नाही. तर, भाजपचे नेते सभागृहात अनपार्लमेंटरी शब्दाचा वापर करतात. रेकॉर्ड बघा, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही असे प्रशांत पडोळे म्हणाले. लोकसभेत निलंबित करण्यात आलेले काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांची भाजप सरकारवर सडकून टीका केली. गोसेखुर्द प्रकल्प बाधितांच्या पाठीशी प्रियंका गांधींनी पूर्ण पाठिंबा दिला असून ताकदीनिशी मदत करायला त्यात तयार आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही तिथं लढत राहू, निलंबन तर, माझ्यासाठी ही छोटी गोष्ट आहे. जनतेच्या प्रश्नावर मला फासावर जरी चढवलं तरी, मी चढायला तयार आहे, असं म्हणत निलंबित खासदार प्रशांत पडोळे यांनी केंद्र सरकारवर चांगलीच टीका केली आहे. लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनावरील चर्चेदरम्यान गोंधळ घातल्या प्रकरणी मंगळवारी आठ विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आलं. या सर्वांनी अध्यक्षांच्या आसनाकडे कागद फेकले आणि गोंधळ घातला, अशी माहिती पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी दिली.

भाजपचे नेते कितीतरी अनपार्लमेंटरी शब्दांचा सभागृहात वापर करतात.

जनतेचे प्रश्न, जनतेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेत आम्ही किंवा आमचे नेते राहुल गांधी प्रश्न मांडू शकत नसेल तर, लोकसभा कशासाठी आहे? असा सवाल पडोळे यांनी केला. आमच्यावर कागद फाडण्याचा आरोप होत आहे. मात्र, भाजपचे नेते कितीतरी अनपार्लमेंटरी शब्दांचा सभागृहात वापर करतात. सभागृहाचा इतिहास बघून घ्या. रेकॉर्ड बघून घ्या. यांच्यावर कोणतीही आणि कसलीही कारवाई होत नाही असे पडोळे म्हणाले. मी स्पष्टपणे, या सरकारला आणि मोदीजींना सांगू इच्छितो की, जनतेच्या सर्व प्रश्नासाठी आम्ही तिथं लढत राहू. निलंबन तर छोटीशी गोष्ट आहे. तुम्ही मला जनतेच्या प्रश्नासाठी फासावर जरी चढवलं तरी, आम्ही फासावर चढायला तयार आहोत असे पडाळो महणाले.  

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.