टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून रोज काही नाही घडत आहे. मग नवे विक्रम असो की जुने विक्रम मोडण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी हॅटट्रीक, जबरदस्त झेल आणि धाकधूक वाढवणारे सामने पाहता आले. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. या दोन वेगवेगळ्या सामन्यात घेतलेल्या झेलची चर्चा रंगली आहे. पहिला झेल हा झिम्बाब्वे विरुद्ध ओमान सामन्यात पकडला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेच्या ब्रायने बेनेटने जबरदस्त झेल पकडला. ब्रायन 19 मीटर धावत मोठी उडी घेतली आणि झेल घेतला. हा झेल घेताना दूरपर्यंत मैदानावर घासत गेला, पण झेल सोडला नाही. या झेलची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दुसरा झेल दक्षिण अफ्रिका आणि कॅनडा सामन्यात पकडला गेला. रायन रिकल्टनचा अप्रतिम झेल हर्ष ठाकरने सीमेरेषेवर पकडला. हा नुसता झेल नव्हता तर षटकारही वाचवला. चला या दोन्ही झेलबाबत जाणून घेऊयात
टी20 वर्ल्डकपच्या तिसऱ्या दिवशी झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटने 20व्या षटकाच्या पाचव्या चेंडवर हा झेल पकडला. नदीम खानने ब्रॅड इवान्सच्या गोलंदाजीवर मिड विकेटला फटका मारला. यावेळी डीप स्क्वेअर लेगला असलेल्या बेनेट वेगाने डाव्या बाजूला धावत सुटला. यावेळी त्याने 19 मीटरची धाव घेतल्यानंतर उडी मारली आणि झेल पकडला.
Brian Bennett took flight and took our breath away with a catch of the tournament contender 😮💨
Follow the #T20WorldCup here 👉 https://t.co/lkOSOhmQDQ pic.twitter.com/bWoirKmWDY
— ICC (@ICC)
कॅनडाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दक्षिण अफ्रिकेचा धावगतीला ब्रेक लावण्याचा कॅनडाने पुरेपूर प्रयत्न केला. या सामन्यात तिसरी विकेट ही रायन रिकल्टनची विकेट पडली. ही विकेट सहज मिळाली नाही. रिकल्टनने 21 चेंडूत 33 धावा केल्या. या तीन चौकार आणि 1 षटकार मारला. अंश पटेलच्या चेंडूवर त्याने उत्तुंग फटका मारला होता. षटकार जाईल असं वाटलं होतं. पण हर्ष ठकरने जबरदस्त झेल पकडला.
Only this kind of catch could have stopped MARKRAM tonight!
What a grab from Canada’s Heyliger👏🏽#Cricket #T20WorldCup pic.twitter.com/XdLvlltMn8
— CREX (@Crex_live)
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजच्या हेटमायरने अप्रतिम झेल पकडला होता. तर मॅकमुलेनने हेटमायरचा जबरदस्त झेल पकडला. या दोन्ही झेलची पहिल्या दिवशी चर्चा झाली होती. आता यात आणखी दोन झेलची भर पडली आहे.