पुरुष आणि सौंदर्य
esakal February 10, 2026 08:45 AM

‘ती’चा भवताल ----------लोगो
(३ फेब्रुवारी टुडे ३)

पुरुष अन् सौंदर्य

आजच्या वेगवान आणि बदलत्या युगात सौंदर्य आणि स्वतःची काळजी घेणे केवळ स्त्रियांचे नाही तर पुरुषांचेसुद्धा एक महत्त्वाचे अंग बनलेले आहे. पूर्वी पुरुषांनी दैनंदिन काळजी, फेसकेअर्स, स्किन ट्रीटमेंट किंवा इतर सौंदर्यसेवांबद्दल फारसे विचार केले नाही; परंतु आता समाजात बदल घडत आहेत आणि पुरुषदेखील सौंदर्य, त्वचेची काळजी आणि स्वतःची उभारणी या बाबतीत जागरूक होत आहेत. पुरुषांसाठी सौंदर्य हे फक्त देखणे दिसणे नसून आत्मविश्वास, व्यक्तिमत्व आणि सुसंस्कृत जीवनशैलीचा भाग बनले आहे.

rat९p२.jpg-
26O23089
- मेधा कुळकर्णी, आर्या ब्युटीकेअर
------


कोणत्याही व्यक्तीचे सौंदर्य किंवा आत्म-ग्लो हा फक्त फॅशन ट्रेंड नाही तर एक मानसिक, सामाजिक आणि वैयक्तिक गरज बनत चालला आहे. पुरुष सौंदर्याची काळजी घेण्याची मागणी वाढण्याची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
आत्मविश्वास वाढवणे ः आजच्या स्पर्धात्मक जीवनात आत्मविश्वासाचे महत्त्व अधिक आहे. चांगले रूपरंग, तंदुरूस्त त्वचा आणि व्यवस्थित देखणे दिसणे हे व्यक्तिमत्त्वाला निखरतं आणि पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढवते.
करिअर आणि सामाजिक छाप ः ऑफिस, मेळावे, इव्हेन्ट किंवा पेशेवर जीवनात एक आकर्षक आणि स्वच्छ व्यक्तिमत्त्व मनावर सकारात्मक परिणाम करतं.
त्वचेची योग्य काळजी ः प्रदूषण, उन्हाचा परिणाम, तणाव आणि कमीत कमी काळजीमुळे त्वचेच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे बेसिक फेसवॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन यांची गरज सर्वांसाठी वाढली आहे. पुरुषही यापासून बाधित नाहीत. पुरुषांसाठी सौंदर्य सेवा आहे. पुरुष सौंदर्यक्षेत्रात आज विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स, प्रक्रिया, उपाय आणि उत्पादनं उपलब्ध आहेत. हे सर्व पार्लर किंवा स्पामध्ये करता येतात. हे करताना उद्दिष्ट फक्त त्वचा निखार येणे असे नाही तर आरोग्यदायी, प्रतिबंधात्मक आणि मानसिक ताजगी आणणे आहे.

- पुरुष सौंदर्यसेवांचे प्रकार
१. फेस ट्रीटमेंट्स ः पुरुषांसाठी फेस ट्रीटमेंट्स हे सर्वात अधिक लोकप्रिय सेवा आहेत. ही सेवा पुढील प्रकारची असू शकतात ः
डीप क्लेन्सिंग फेस ः त्वचेतील मळकट आणि मृत त्वचा काढून त्वचा स्वच्छ आणि ताजगी.
अॅक्ने ट्रीटमेंट ः पुरुषांना येणाऱ्या पिंपल्स, ब्लॅकहॅड्स यावर विशेष उपाय.
ब्राइटनिंग फेस ः त्वचा उजळण्यास, थकलेल्या त्वचेचा ग्लो परत मिळवण्यासाठी.
अॅंटीएजिंग फेस ः लवकर सुरुवातीला वृद्धत्वाचे लक्षणे कमी करण्यासाठी. हे ट्रीटमेंट्स प्रोफेशनल ब्युटिशियन किंवा डर्माटोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाने केले जातात आणि त्यात योग्य उत्पादनांची निवड करून आपल्या त्वचेची गरज ओळखली जाते.
२. बॉडी ट्रीटमेंट्स-पुरुषांसाठी फक्त चेहऱ्यापुरती सौंदर्यसेवा नाही तर बॉडी ट्रीटमेंटही महत्त्वाची आहे. यामध्ये बॉडी स्पा, स्क्रब व एक्सफोलिएशन, बॅक क्लेन्सिंग, मसल रिलॅक्सिंग मसाजेस, जसे या सेवा आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यास उपयुक्त आहेत.
३. वॅक्सिंग आणि हेअर रिमुव्हल - पुरुषांसाठी बॉडी हेअर रिमुव्हलसुद्धा आज सामान्य झाला आहे. हेअर फॅशनेबल स्टाइलेसाठी किंवा स्वच्छ जवळून दिसण्यासाठी बॅक, चेस्ट, आर्म्स, लेग्ससारख्या भागांवरील अनवांछित केस वॅक्सिंगद्वारे काढले जातात.
४. स्काल्प आणि हेअरकेअर ः पुरुषांसाठी संख्या वाढत आहेत जे थिनिंग हेअर, डॅंड्रफ आणि तेलकट स्काल्पसारख्या समस्यांमुळे त्रस्त आहेत. त्यासाठी स्काल्प मसाज हेअर स्पा ट्रीटमेंट हेअर स्टाइलिंग आणि हेअर प्रॉडक्ट सल्ला ही सेवाआधुनिक ब्युटी पार्लर्समध्ये उपलब्ध आहेत.
५. पुरुषांसाठी स्पेशल मसाज सेशन्स ः उदा. डिप्रेशन किंवा स्ट्रेस रिलीफ मसाज, थेरप्युटिक मसाज, एरोमा मसाज घेता येतात. हे खूप शांत करणारे आणि शरीराला ताजेतवाने करणाऱ्या प्रक्रिया आहेत, जे पुरुष ग्राहकांसाठी खूप उपयुक्त ठरत आहेत.

पुरुष सौंदर्यासाठी उपलब्ध उत्पादने ः आज पुरुषांसाठी बाजारात अनेक स्पेशलाइज्ड स्किनकेअर प्रॉडक्ट्स उपलब्ध झाले आहेत. यात काही महत्त्वाची श्रेणी फेसवॉशेस - तेलकट त्वचा, ड्राय स्किन, सेंसिटिव्ह स्किन. मॉइश्चरायझर - एसपीएफ असलेले सनस्क्रीन, बियर्ड ऑईल आणि बियर्ड केअर प्रॉडक्ट्स, पिस्टिक ट्रीटमेंट्ससाठी आय क्रीम, एजिंग क्रीम, पोर्स ट्रीटमेंट्स. ही सर्व उत्पादनं पुरुषांच्या त्वचेच्या गरजेनुसार बनवलेले असतात आणि वापरात सुलभ असतात.
पुरुष सौंदर्याचे मानसिक आणि सामाजिक फायदे ः फक्त दिसायला चांगलं वाटणं, हेच एकमेव उद्दिष्ट नाही. सौंदर्याची काळजी घेतल्यामुळे होणारे बरेच मानसिक फायदे आहेत. आत्मसन्मान वाढतो, आत्मविश्वास वाढतो, व्यावसायिक आणि व्यक्तिगत संवादात सुधारणा ः तणाव नियंत्रण संपूर्ण आरोग्याची जाणीव
पुरुष ब्युटीपार्लर एक बदलती गरज ः आज अनेक ब्युटीपार्लर्स किंवा स्पासेंटर आता जेंडर न्यूट्रल सेवांचा पर्याय देतात जिथे पुरुष आणि महिला दोघेही तितक्याच सन्मानाने, सहजतेने आणि आरामाने सेवा घेऊ शकतात. यामध्ये हे जागे आहेत ः नियमानुसार आणि सुरक्षिततेच्या मानकांनुसार सेवा, व्यावसायिक प्रशिक्षित स्टाफ, वेगवेगळ्या पक्वतेच्या समस्यांसाठी सल्ला, वैयक्तिक त्वचा प्रकार आणि समस्या विश्लेषण

* निष्कर्ष
आजचा पुरुषसौंदर्याबद्दल आधीपेक्षा अधिक संवेदनशील आणि जागरूक आहे. त्याला फक्त दिसायला चांगलं वाटावं इतकंच नव्हे; पण स्वतःच्या त्वचा, मन आणि व्यक्तिमत्त्वाची काळजी घ्यायची आहे. जसे स्त्रिया ब्युटीपार्लरमध्ये जाऊन आपल्या सौंदर्यावर काम करतात त्याचप्रमाणे पुरुषांसाठीसुद्धा अनेक ताजेतवाने, विश्रांती देणारे आणि प्रभावी ट्रीटमेंट्स ब्युटीपार्लर्समध्ये उपलब्ध आहेत. आजच्या काळात पुरुषसौंदर्य ही एक फॅशन ट्रेंड नसून जीवनशैली, आत्मविश्वास आणि स्वत:ची काळजी यांचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे.

( लेखिका ब्युटी थेरपिस्ट हेअरड्रेसर अरोमा थेरेपिस, CIDESCO (zurich)PHD आहेत.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.