प्रसिद्ध फिल्ममेकर अन् बाल कलाकाराच्या वडिलांचे निधन; घरात आढळला मृतदेह, दुर्गंधीमुळे घटना उघड
भाग्यश्री कांबळे February 20, 2026 02:43 PM

M. M. Beg Father of Baby Guddu Dies Alone at Residence: मनोरंजनसृष्टीतून अतिशय दु:खद  घटना समोर येत आहे. ज्येष्ठ सिनेसृष्टीतील फिल्ममेकर एम.एम बेग यांचं निधन झालं आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी आणि माजी बाल कलाकार बेबी गुड्डू  यांचे वडील म्हणून ओळखले जात होते.  मीडिया रिपोर्ट्सनुसार,  फिल्ममेकर बेग यांचा मृतदेह घरात आढळून आला आहे.  एक आठवड्यांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली होती. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास करुन मृतदेह ताब्यात घेतला आहे.  त्यांच्या निधनाची बातमी पी.आर हनीफ जावेरी यांनी दिली आहे. 

फिल्ममेकर बेग यांचे जनसंपर्क अधिकारी हनीफ जावेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार,  'चित्रपट निर्माते एम.एम बेग हे बऱ्याच काळापासून आजारी होते. ते एकटेच राहत होते.  चार ते पाच दिवस ते घराबाहेर आले नाही. तेव्हा घरातून दुर्गंधी येऊ लागली होती.  शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी एम.एम  बेग यांचा दरवाजा तोडला. तेव्हा बेग यांचा मृतदेह आढळला.  त्यांच्या मुलीला याची माहिती देण्यात आली',  असं त्यांनी सांगितलं.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.  तसेच दीड ते दोनच्या  दरम्यान, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.  हनीफ म्हणाला, 'हनीफ हा खूप प्रेमळ व्यक्ती होता.  त्याच्या आत्म्याला शांती मिळो, अशी मी प्रार्थना करतो'. दरम्यान, बेग यांच्या मृत्यूनंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. दरम्यान,  त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. 

एम. एम बेग हे चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज चित्रपट  निर्माते होते.  त्यांनी बराच काळ या इंडस्ट्रीत काम केलं आहे.  त्यांचा शांत आणि प्रेमळ स्वभाव इंडस्ट्रीतील लोकांना आवडत होता. त्यांची मुलगी बेबी गुड्डू हिनं 1980 आणि 1990 या काळात बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. ती त्या काळातील प्रसिद्ध कलाकार होती.  एम. एम बेग यांनी  ओम प्रकाश, विमल कुमार आणि राकेश रोशनसारख्या चित्रपट  निर्मात्यांचे सहाय्यक म्हणून त्यांच्या कारकि‍र्दीची सुरुवात केली. 

एम.एम बेग यांनी ह्रतिक रोशनला सुरुवातीच्या काळात खूप मदत केली. त्याला सुपरस्टार बनवण्यात त्यांचा मोठा हात आहे.  ह्रतिकच्या पहिल्या चित्रपटात, संवाद, आवाजाचे मॉड्युलेशन तसेच शब्द लेखन कसे करावे?  हे त्यांनी शिकवले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.