मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. विनोदी भूमिका असो किंवा गंभीर अशोक सराफ यांनी आपल्या हटके स्टाइलने त्या भूमिका साकारल्या. मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या तोडीस तोड एक अभिनेता होता तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत यांनीही आपल्या कारकिर्दीत अनेक विनोदी भूमिका साकारल्या. तसेच ते काही गंभीर भूमिकांमध्येही दिसले. 'एक होता विदूषक' यातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. असं असूनही अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांनी त्यांना फॉलो केलं असं म्हटलंय. सोबतच लक्ष्याने विनोदी भूमिका सोडून इतर काही केलं नाही असं ते म्हणाले.
अशोक यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणालेले, 'लक्ष्या एक टॅलेंटेड आर्टिस्ट होता. काय काय आर्टिस्टने काहीही बॅकग्राऊंड नसताना आपलं करिअर सुरू केलं आहे त्यातील तो एक आहे. त्याला आगापिछा काहीच नाही. नाटकाचं नाही, सिनेमाचं नाही कसंलच बॅकग्राऊंड नाही. घरी कोणी केलेलं आहे, मोठा नट आहे असं काहीही नाही. बारीक बारीक रोल करून तो पुढे आला. हे त्याच्यासाठी क्रिडिटेबल आहे. कोणाचाही आधार नसताना त्याने हे केलं. त्याने केलेले सगळे रोल तुम्ही जर काढून बघितले तर त्याचे आणि माझे रोल हे मला फॉलो केल्यासारखे आहेत. त्याने स्ट्रेट मला फॉलो केलेलं आहे अर्थात त्याने ते वेगळ्या स्टाइलने केलेत. स्टाइल वेगळी होती पण एकंदरीत टायमिंग तेच आहे.'
ते पुढे म्हणाले, 'फार लवकर गेला होता.नाहीतर त्याने बरंच काही केलं असतं. त्याचा ड्रॉबॅक एवढाच झाला की तो कॉमेडी तर कॉमेडीच घेऊन बसला. त्याने व्हरायटी काहीच केली नाही. आम्ही दोघांनी मिळून 50 सिनेमात एकत्र काम केलं. तो माझ्याबरोबर नेहमी सहाय्यक होता. मी हिरो तर तो माझा भाऊ, ड्रायव्हर किंवा आणि कोणी. त्याची एक वेगळी स्टोरी सिनेमात असायची. ज्यावेळेस राजा परांजपे, मास्टर विनायक काम करायचे ती वेगळी स्टाइल होती. ती हळू हळू कमी होत गेली. पिढी बदलली तसे विनोद बदलले, अँक्शन बदलत गेल्या. जमाना फास्ट झाला. त्यावेळेला आम्ही खुसलो. आम्ही लोकांना थिएटरमध्ये येण्यासाठी भाग पाडलं. लोक त्यावेळेस थिएटरला यायचे.'
सलमान खानच्या आजोबांना मिळालेला जमिनीत गाडलेला खजिना; त्यांनी त्या पैशांचं काय केलं? सरकारला न देता सरळ...