Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam OTT: या वर्षाची मराठी मनोरंजनाची सुरुवात धमाकेदार झाली ती क्रांतीज्योती महाविद्यालय मराठी माध्यम या चित्रपटामुळे. 2026 च्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला होता. बॉक्स ऑफिसवर आल्यानंतर या चित्रपटानं सगळे रेकॉर्ड मोडले. चित्रपट बघता बघता हाऊसफूल झाला. या चित्रपटाने सगळ्यांचीच मने जिंकली. हा चित्रपट साऱ्यांनाच त्यांच्या शाळेची, बालपणीच्या गोड आठवणींमध्ये गेला. या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये जवळपास 25 कोटींची कमाई केली. थिएटरमध्ये या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला.थिएटर गाजवल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर येण्यास सज्ज झालाय.
महाराष्टभर एकीकडे मराठी शाळा धोक्यात असल्याच्या अनेकदा चर्चा होताना दिसतात, पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये दाखला देतात, पण मराठी शाळांमध्ये टाकत नाहीतण् पण मराठी शाळांमधून, मराठी माध्यमातून शिकण्याचा आनंद, शाश्वतता आणि आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोण विकसित होतो हे या चित्रपटातून साऱ्यांनीच अनुभवले. पण आता ज्यांना चित्रपट थिएटरमध्ये बघता आला नाही त्यांना तो ओटीटीवर पाहता येणार आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित क्रांतीज्योती विद्यालया मराठी माध्यम हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ओटीटी विश्व गाजवणार आहे. हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून 27 फेब्रुवारीपासून पाहता येणार आहे. मातृभाषेत शिकल्याचं महत्व सांगणारा चित्रपट मराठी भाषा गौरव दिनी डिजिटल प्रीमियर होणार आहे.
सचिन खेडेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी (मराठी चित्रपटातील पदार्पण), क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि कादंबरी कदम अशा उत्तम कलाकारांची तगडी फौज असलेल्या या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच खूप प्रेम मिळवलं. आता हा चित्रपट डिजिटल प्रीमियरच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना पाहता येणार आहे.चित्रपटगृहांत प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम भारावून टाकणारं होतं. आता मराठी ZEE5च्या माध्यमातून असंख्य घरांपर्यंत आणि मनांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 50 दिवसांत 25 कोटींच्यावर कमाई केली आहे.