Dharashiv: पुतण्या काकाच्या मुळावर उठला, किडनॅप करून बेदम मारले; साडेसहा एकर जमीन केली नावावर
Saam TV February 21, 2026 08:45 AM
Summary -
  • पुतण्याने जमिनीसाठी काकाचे अपहरण केल्याचा आरोप

  • वृद्ध शेतकऱ्याला डांबून ठेवून बेदम मारहाण केली

  • साडेसहा एकर जमीन जबरदस्तीने नावावर करून घेतली

  • पोलिसांनी तक्रार नोंदवली नसल्याचा आरोप

बालाजी सुरवरे, धाराशिव

जमिनीसाठी पुतण्या काकाच्या मुळावर उठल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली. पुतण्याने जमिनीसाठी काकाचे अपरहण केलं. डांबून ठेवत त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर जबरद्ती करत पुतण्याने तब्बल साडेसहा एकर जमीन आपल्या नावावर करून घेतली. या घटनेमुळे धाराशिवमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलेल्या पीडित व्यक्तीची तक्रार पोलिसांनी नोंद करून घेतली नाही असा आरोप त्यांनी केला.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटसांगवी गावात ६० वर्षांच्या काकाचे सख्ख्या पुतण्याने अपहरण केले. पुतण्याने काकाकडून जबरदस्तीने जमीन खरेदी करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित वृद्ध शेतकऱ्याला अनेक दिवस डांबून ठेवून मारहाण आणि दमदाटी करण्यात आली. या दबावाखाली त्याच्या नावावर असलेली साडेसहा एकर जमीन जबरदस्तीने पुतण्याने खरेदी करून घेतल्याचा आरोप आहे.

Dhule Crime : लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! ८ जणांवर चाकूने सपासप वार, तिघांचा जागीच मृत्यू

या प्रकरणात पुतण्यासह काही गुंडांचा सहभाग असल्याचे शेतकरी शहबुद्दीन सय्यद यांनी सांगितले आहे. यासंदर्भात शेतकरी शहबुद्दीन सय्यद यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र,पोलिसांनी तक्रार स्वीकारली नसल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे. वृद्ध शेतकऱ्याचे अपहरण करून मारहाण होऊनही पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

Navi Mumbai Crime: “पोलीस ठाण्यात गेलास तर मर्डर”; खारघरमध्ये तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, न्याय मिळावा आणि संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून जमीन परत मिळावी, या मागणीसाठी शहबुद्दीन सय्यद यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या अपहरण आणि मारहाणीच्या घटनेमुळे भूम तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कोणतिही कारवाई न केल्यामुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे

Crime : लेकीचा मृतदेह गादीत गुंडाळला अन् कारमधून निघाले; पण 'त्या' एका संशयाने सगळा डाव उधळला!
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.