बंगळूर : लष्कर-ए-तौयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध ठेवून कारागृहातील सहकैद्यांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या जुनैद अहमद (वय ३३) याच्या शोधासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पाच लाखांचे (Bengaluru Terror Investigation) रोख बक्षीस जाहीर केले आहे.
या प्रकरणात नुकतेच दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल करताना एनआयएने जुनैद अहमदची आई अनीस फातिमा, सहाय्यक उपनिरीक्षक चान पाशा तसेच परप्पन अग्रहार केंद्रीय कारागृहातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. नागराज एस. यांना आरोपी म्हणून नमूद केले आहे. त्यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हे नोंद केले आहेत.
Sangli Road Potholes : सांगलीत अनोळखी व्यक्तींनी तब्बल 100 खड्ड्यांत ठेवल्या चिठ्ठ्या; असं काय लिहिलंय चिठ्ठीत? प्रकरणाची पार्श्वभूमी२०२३ मध्ये बंगळूरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणून देशाच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा कट उघडकीस आला होता. स्थानिक गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या काही आरोपींचा तुरुंगात असताना दहशतवादी घटकांशी संपर्क आला होता. त्यांच्या प्रेरणेने दहशतवादी कृत्ये करण्यासाठी शस्त्रे, दारूगोळा आणि डिजिटल साधने जमा केल्याचे तपासात स्पष्ट झाले. ही सामग्री पोलिसांनी जप्त केली होती.
२००८ च्या बंगळूर साखळी स्फोट प्रकरणातील आरोपी टी. नसीर याला न्यायालयात नेत असताना त्याला पळवून नेण्याचा कटही रचण्यात आल्याचे समोर आले आहे. बंगळूर पोलिसांनी नोंदवलेला हा गुन्हा एनआयएने ऑक्टोबर २०२३ मध्ये आपल्याकडे घेतला होता. त्यानंतर फरार असलेल्या जुनैद अहमदसह नऊ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
Woman Killed in Tiger Attack : नागपूरमध्ये वाघाचा थरार! शेतात काम करणाऱ्या महिलेचा काळजाचा थरकाप उडवणारा अंत; संपूर्ण गाव दहशतीत! आईकडून आर्थिक व लॉजिस्टिक मदतएनआयएच्या तपासानुसार जुनैदची आई अनीस फातिमा हिने परप्पन अग्रहार कारागृहात असलेल्या टी. नसीरला आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत पुरवली. मुलाच्या सूचनेनुसार तिने हँडग्रेनेड आणि वॉकी-टॉकींची व्यवस्था करून आरोपींमधील संपर्क सुलभ केला.
तसेच प्रमुख आरोपी सलमान खान याला आश्रय देऊन त्याच्या प्रवासाला लागणाऱ्या कागदपत्रांची व्यवस्था केली. त्याला दुबईला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. नंतर आफ्रिकेतील रवांडा देशात सलमान खानला अटक करून भारतात आणण्यात आले. त्यामुळे सध्या फरार असलेल्या जुनैदच्या अटकेसाठी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले असून माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे एनआयएने स्पष्ट केले आहे.