चऱ्होली खुर्दला आज कलशारोहण सोहळा
esakal February 22, 2026 05:45 AM

आळंदी, ता. २१ : चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथील शीतळादेवी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा रविवारी (ता. २२) आयोजित केला आहे. यामध्ये सकाळी सात वाजता पुतळा देवी मूर्ती व कलशाची मिरवणूक, त्यानंतर पावणेआठ वाजता मंदिर प्रवेश होणार आहे. साडेनऊ वाजता मूर्ती व अभिषेक आणि दहा वाजता गणेश पूजन व कलश पूजन आणि बारा वाजता मुख्य प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यानंतर एक वाजता मंदिरावर कलशारोहन, दुपारी दोन वाजता होम हवन व सायंकाळी चार वाजता भजनाचा कार्यक्रम होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.