आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारे आणि निधनापश्चातही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांनी साकारलेल्या बहुतेक भूमिका हिट ठरल्या. ज्या चित्रपटात प्रेक्षकांचा आवडता लक्ष्या असायचा तो चित्रपट हिट असं समीकरण ठरलेलं असायचं. त्यांच्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करायचा. त्यांच्या चित्रपटांना प्रचंड यश मिळालं. मराठीसोबतच हिंदीमध्येही त्यांनी आपली छाप पाडली. मात्र एका बॉलिवूड अभिनेत्यामुळे त्यांना मार खावा लागलेला. एका मुलाखतीत त्यांनी तो किस्सा सांगितला होता.
लक्ष्मीकांत यांचा जन्म अतिशय साध्या घरात झाला. त्यात आई -वडील आणि पाच भावंडं एवढा गोतावळा होता. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताची होती. मात्र घरात आनंद भरपूर होता. त्यांच्या आईदेखील लक्ष्मीकांत त्यांच्यासारख्याच खेळकर होत्या. कदाचित आईचाच हा गुण त्यांच्यात उतरला असावा. लहानपणी त्यांना वाटायचं की मोठे झाल्यावर बस कंडक्टर व्हायचं आणि तिकिटांचे पैसे स्वतःकडे ठेवून श्रीमंत व्हायचं. मात्र नंतर कळलं की ते पैसे ऑफिसमध्ये जमा करावे लागतात. तेव्हा त्यांनी तो विचार सोडून दिला. अशाचह एका मुलाखतीत त्यांनी वडिलांचा मार पडल्याचा किस्सा सांगितला होता.
अशोक सराफ यांनाही झाली 'ग'ची बाधा? लक्ष्मीकांत यांच्याबद्दल बोलताना म्हणाले- त्याने नेहमी माझ्या ड्रायव्हर, भावाची भूमिका ...जितेंद्र यांच्यामुळे खाल्लेला मार
त्या काळात बॉलिवूडमध्ये हिरो जे करेल तीच स्टाइल असायची. अनेक तरुण हिरोंना फॉलो करायचे. त्यातच जितेंद्र यांची चलती होती. एका चित्रपटात जितेंद्र यांनी घट्ट पॅन्ट घातली नंतर ती त्यांची स्टाइल झाली. दुसरीकडे लक्ष्मीकांत यांनीही तशीच पॅन्ट शिवून घेतली. अगदी घट्ट पॅन्टमुळे त्यांना उठता बसता येईना झालं. त्यामुळे एके दिवशी अखेर ती पॅन्ट फाटली. टाइट पॅन्ट त्याकाळी खूप महाग होती. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना मारलं होतं. जेव्हा त्यांना हिंदी चित्रपट मिळाला तेव्हा एका मुलाखतीत जितेंद्र यांच्या पॅन्टमुळे आपण मार खाल्ला होता असं ते म्हणाले. जे ऐकून सगळेच हसले होते. लक्ष्मीकांत गेले मात्र त्यांच्या आठवणी आणि त्यांचा विनोद कायमचा प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेलाय.
स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका; दिसणार अंध मुलीची गोष्ट; तारीखही ठरली, नाव वाचलंत का?