Bigg Boss Marathi 6 : ना दीपाली ना रुचिता बिग बॉस मराठीच्या घरातून 'या' सिंगरची एक्झिट !
esakal February 22, 2026 05:45 AM

Marathi Bigg Boss Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या चर्चेत आहे. राखीच्या एंट्रीनंतर बिग बॉस मराठीमध्ये खरी रंगत यायला सुरुवात झाली आहे. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्याचं एलिमिनेशन पार पडणार आहे. वोटिंग ट्रेंड काहीही असले तरीही या आठवड्यातही धक्कादायक एलिमिनेशन होणार असल्याचं म्हटलं जातंय.

या आठवड्यात रोशन भजनकर, सचिन कुमावत, राकेश बापट, प्रभू शेळके,अनुश्री माने, रुचिता जामदार, प्राजक्ता शुक्रे, सागर कारंडे, दीपाली सय्यद नॉमिनेट आहेत. यांच्यापैकी कोण घराबाहेर जाणार हे उद्या एपिसोड मध्ये समजेल.पण सोशल मीडियावरील पेजवर एका नावाची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडिया पेजेस आणि रेडिटवरील चर्चांनुसार गायक सचिन कुमावत या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून एलिमिनेट झाले आहेत. अहिराणी गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले सचिन बिग बॉस च्या घरात मात्र त्यांचा परफॉर्मन्स तितक्या प्रभावीपणे सादर करू शकले नाहीत. सगळ्यांसोबत संबंध चांगले होते पण कधीच त्यांनी स्वतःसाठी स्टॅन्ड घेतला नाही असं अनेकांनी मत व्यक्त केलं.

सोशल मीडियावर जरी सचिनच्या नावाची चर्चा असली तरीही अनेकांना या आठवड्यात प्रभू किंवा प्राजक्ता बाहेर पडेल असं वाटत आहे. पण नक्की घराच्या बाहेर कोण जाणार हे उद्या रविवारच्या एपिसोडमध्ये समजेल.

तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 6 दररोज रात्री 8 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टारवर कधीही.

‘भूत बंगला’मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार मिथिला पालकर; साकारणार 'ही' भूमिका
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.