राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात रात्री समुद्रात स्फोटा सारखे आवाज
खोल समुद्रात २० नाँटीकल माईल मधून स्फोटासारखे आवाज आल्यानं परिसरात भीतीच वातावरण
समुद्रातील स्फोटाच्या आवाजाचे गुढ उकलण्यात तटरक्षक आणि पोलीस दलाला यश
खोल समुद्रातून जाणाऱ्या टग म्हणजेच मोठ्या बोटीवरून सिग्नल पिस्टल मधून फायर केल्याने आले होते आवाज
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती
रात्रीपासून पोलिस यंत्रणेकडून गूढ आवाजा संदर्भात होता सुरु
यंदा कलिंगड खातेय चांगलाच भाव. प्रति किलो बावीस रुपये दरनांदेड जिल्हयात गत वर्षी हंगामातील याच महिन्यात कलिंगडाला प्रति किलो आठ ते नऊ रुपये दर होता.पण यंदा रमजान महिन्याचा उपवास,यावर्षी कमी लागवड आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी यामुळं कलिंगड चांगलाच भाव खातेय.खरीप हंगामातील ओल्या दुष्काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे मात्र चांगला दिलासा मिळाला.यंदा प्रति किलो बावीस रुपये दर जाग्यावरच मिळत आहे. त्यामूळे शेतकरी समाधानी आहेत.व्यापारी थेट शेतात येऊन जागेवरच चांगला भाव देत असल्याने खर्च वजा करुन शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.
- सोलापुरातील मोहोळ मध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला- काल मध्यरात्री शंभू प्रेमींकडून मोहोळ एसटी स्टॅन्डसमोर पुतळा उभारण्यात आलाय
- परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली सुरू
- मात्र पुतळा हटवण्याला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध
- या ठिकाणाहून पुतळा हटवल्यास मोहोळ बंद ठेवण्याचा शंभू प्रेमीचा ईशारा
- पुतळा काढण्यावरुन पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
लहरी हवामानाचा देवगड हापूसला फटका- राजू शेट्टींनी केली पाहणीसिंधुदुर्गातल्या देवगड हापूसला लहरी हवामानाचा फटका बसला आहे. सुरूवातीला चांगला आलेला मोहोर खार पडल्यामुळे करपून गेला आहे तर काही ठीकाणी तुडतुड्या कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आंब्याचा फुलोरा गळून पडला आहे. कोकणातील आंबा उत्पादक बागायतदार यामुळे संकटात सापडला आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी नुकतीच देवगड येथे भेट देऊन आंबाबागांची पाहणी केली यावेळी त्यांनी बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 20 टक्के सुद्धा शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार नाही त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन बागायतदारांना ठोस मदत करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
सांगली..बिबट्याने दोन दुचाकींवर झडप घालत हल्ला केला.. या हल्ल्यात दोघे जखमी..सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि वाळवा तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने लहान बालकाला ठार केल्याची घटना ताजी असतानाच बिबट्याने दोन दुचाकींवर झडप घालत हल्ला करुन दोघांसह व एका बारा वर्षाच्या मुलाला जखमी केले. सदरची घटना पेठ-नायकलवाडी रस्त्यावर घडली. महिनाभरापूर्वी बिबट्याने चार ते पाच दुचाकींवर हल्ला करून लोकांना जखमी केले होते. या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे.
कोकणात काजूच्या हंगामाला सुरुवात; शेतकऱ्यांच्या काजूला 160 रूपयांचा दर.कोकणात काजूच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यावर्षी काजूच्या उत्पन्नात वाढझाल्यामुळे काजू च्या दरात घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या काजूला बाजारात 160 रूपयांचा दर मिळत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 10 रुपयांची दरात घट झाली आहे. गेल्यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच 170 रूपयांचा दर मिळाला होता यंदा मात्र किलो ला 160 रूपयांचा दर मिळत आहे त्यामुळे काजू उत्पादक शेतकरी काहीशे नाराज असल्याचे दिसून येत आहे. यंदा मात्र काजूचे उत्पन्न वाढल्यामुळे काजूला कमी दर मिळत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत किलोमागे 10 रूपयांची घट शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. एकीकडे उत्पन्न वाढल्याचा आनंद तर दुसरीकडे दर कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा दिसून येत आहे.
पिसाळलेल्या कोल्ह्याचा थरार! शेतशिवारात ७ शेतकऱ्यांवर हल्ला, ३ गंभीरभंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालोरा आणि केसलवाडा परिसरात एका पिसाळलेल्या कोल्ह्यानं अक्षरशः हैदोस घातला असून, शेतशिवारात कामासाठी गेलेल्या सात शेतकऱ्यांवर भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात सातही जण जखमी झाले असून, तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. नेहमीप्रमाणे शेतकरी आपल्या कामासाठी शेतात गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या एका पिसाळलेल्या कोल्ह्यानं अचानक शेतकऱ्यांवर झडप घातली. सात जणांना कोल्ह्यानं जखमी केलं. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात मोठी पळापळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ल्यातील सर्व जखमींना तातडीने करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर चार जणांना घरी सोडण्यात आलं आहे. मात्र, तिघांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनेमुळे शेतकरी आता शेतात जाण्यास घाबरत आहेत. वन विभागानं या पिसाळलेल्या प्राण्याचा तातडीनं बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : कांद्याच्या पिकात अफूची शेती, 27 लाखांची 180 झाडे जप्तवैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील शेतकरी आणि व्यवसायाने कांद्याचा व्यापारी असलेल्या एका महाभागाने कांद्याच्या पिकात चक्क अफूची शेती पिकवली. परंतु, बियांसाठी लावलेल्या कांद्याला बोंडे येण्याआधीच अफूची बोंडे आली आणि बिंग फुटले. स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलिसांच्या पथकाने शनिवारी भल्या पहाटे करंजगावातील शेतावर पाहणी करून तब्बल 27 लाख रुपयांची 180 किलोंची अफूची झाडे जप्त केली.
छत्रपती संभाजीनगर: होर्डिंग लावणाऱ्यांसह मनपा अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखलअनधिकृत बॅनर काढत असताना महानगरपालिकेचे कर्मचारी अमोल जाधव यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. अमोल मृत्यू प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यापैकी पहिला गुन्हा अमोल यांचे मेहुणे महेंद्र श्रीखंडे यांच्या तक्रारीवरुन बीएनएस १०५ सदोष मनुष्यवध आणि ३-५ समान उद्देश साध्य करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींनी केलेली कृती कलमान्वये महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, सुपरवायझर शिवश्याम काळे आणि बॅनर लावणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मनपाचे सहायक आयुक्त प्रसाद देशपांडे यांच्या तक्रारीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. देशपांडे यांच्या तक्रारीनुसार दीपक खोतकर, प्रल्हाद गायकवाड, प्रशांत ठोंबरे, श्रीमंत गायकवाड, रघुनाथ पितळ यांची नावे असलेले अनधिकृत बॅनर लावले होते. हे बॅनर स्वप्नील ऊर्फ सोनू आणि अन्य पाच जणांनी लावले होते. सर्व जण सदोष मनुष्यवधास कारणीभूत ठरल्याने महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ कलम २, सहकलम मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ कलम २४४, २४५ अन्वये गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले, उपनिरीक्षक सचिन वायाळ तपास करीत आहेत.
कांद्याचे दर आठ ते दहा रुपये किलो,कांदा उत्पादक शेतकरी अडचणीतनेहमी दर वाढल्यामुळे गृहिणीच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातच पाणी आणल आहे.कांद्याचे दर बाजारात आठ ते दहा रुपये किलो घसरल्याने लागवडीसह उत्पादन खर्च व वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.धाराशिव जिल्ह्यात पावसाळी कांदा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते मात्र कांदा विक्री करण्याच्या कालावधीतच अनपेक्षित रित्या दर घसरल्याने वाहतूक खर्च व काढणीचा खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून आता हा उत्पादित केलेला कांद्याचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.
मढी यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना या वर्षीही बंदीभक्तांची पंढरी समजल्या जाणाऱ्या आणि राज्यात प्रसिध्द असलेल्या पाथर्डी तालुक्यातील मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांची यात्रा पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. मात्र या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा निर्णय मढी ग्रामपंचायतने घेतला आहे.यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नसल्याने व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे.
आमदार निधीतून अभ्यासिका उभारणी, सोनेगावात स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे आ.कैलास पाटलांच्या हस्ते उद्घाटनग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने धाराशिव तालुक्यातील सोनेगाव येथे आमदार निधीतून स्वामी विवेकानंद अभ्यासिका उभारण्यात आली आहे.ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी दिलेल्या निधीतुन ही सुविधा साकार झाली असुन या अभ्यासिकेचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते पार पडले.
वाल्मीक कराड व मुलांपासून माझ्या कुटुंबास व माझ्या जीवितास धोका ज्ञानेश्वरी मुंडे यांच पोलीस अधीक्षकांना पत्रबीडच्या परळीतील बहुचर्चित प्रकरण व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला दोन वर्षे होऊन गेले आहेत या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून संशयित आरोपींच्या नारको टेस्ट ब्रेक मॅपिंग झाली असून यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांनी वाल्मीक कराडच्या मुलाचे नाव घेतल्यामुळे त्यांना धमकवले जात असल्याचे त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे अह वाल्मीक कराड, सुशील कराड, श्री गणेश कराड यांच्यापासून माझ्या कुटुंबाला धोका आहे याची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पत्राद्वारे पोलीस अधीक्षक त्याचबरोबर सर्व विभागांना त्यांनी पत्र दिल आहे.
बारावीच्या पेपर फुटी प्रकरणात नागपूर विभागीय शिक्षण मंडळ ॲक्शन मोडवर- केंद्रप्रमुखांसह 21 जणांची दुसऱ्या परीक्षा केंद्रावर बदली
- सिव्हिल्स येथील सेंट उर्सुला हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर बारावीचे केमिस्ट्री आणि फिजिक्सचे पेपर फुटल्याची घटना उघडकीस आली....
- त्यानंतर दक्षतेचा भाग म्हणून या परीक्षा केंद्राचे प्रमुख विवेक आतकुरकर यांच्यासह 21 वर्गखोली पर्यवेक्षकांना दुसऱ्या परीक्षा केंद्रावर हलविण्यात आले आहे.
- सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतल्याचे विभागीय शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे
अवैध विदेशी दारुची वाहतूक; ७ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तवाशिमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारंजा ते शेलुबााजार रस्त्यावरील शेवती शिवारात व बेलमंडळ येथील एका घरातून अवैध विदेशी दारू जप्त करुन कारवाई केली. शेवती शिवारात वाहतूक करणारी चारचाकी वाहनासह मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी सचिन काशिनाथ एकनार रा. बेलमंडळ ता. कारंजा व कैलास अवधूत ढोक रा. इंझोरी यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली. या कारवाईत चारचाकी वाहनासह अंदाजे ७ लाख ६७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चंद्रपूर मनपाच्या कंत्राटी अभियंत्याला लाच घेताना अटकचंद्रपूर महानगरपालिकेतील रमाई शहरी आवास योजनेतील कंत्राटी अभियंत्याला १ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना चंद्रपूर लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. शुभम वरघाट असे अटक करण्यात आलेल्या कंत्राटी इंजिनिअरचे नाव आहे. संबंधित तक्रारदाराचे काम मंजूर करून देण्यासाठी आणि फाईल पुढे सरकवण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्याने तक्रारदाराने चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने सापडा रचून अभियंत्याला अटक केली. पुढील तपास चंद्रपूर लाचलुचपत विभाग करीत आहे.
परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाणबीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला आता दोन वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत त्यांचे आरोपी अद्याप पर्यंत सापडले नाहीत मात्र त्यांचाच मुलगा ट्युशन वरून घराकडे येत असताना सोमेश्वर नगर भागामध्ये एका व्यक्तीने त्याला अडवून तू कोणाचा आहे असे विचारले आणि त्याने मी महादेव मुंडे यांचा आहे असे सांगितल्यानंतर दोन कानाखाली झपडा हाणून मारहाण केली आहे मारहाण करणारा बालाजी आघाव असून तो वाल्मीकरांचा समर्थक असल्याचं साम टीव्ही शी बोलताना नातेवाईकांनी सांगितले आहे मारहाण का झाली कशामुळे झाली याची चौकशी आता परळी पोलीस करत असून अज्ञात विरुद्ध परळी पोलिसांमध्ये गुन्हा करण्यात आला आहे.
शिर्डीत तरुणावर चाकू हल्लाराहाता येथील दानिश चौधरी या तरुणावर शिर्डीत जीवघेणा हल्ला...
हल्ल्यात तरुण गंभीर जखमी...
मस्जिदमध्ये नमाज पढवण्यासाठी आलेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी केले वार...
तरुणावर साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू...
पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू...
शिर्डी पोलिस ठाण्यासमोर जमला मोठा जमाव.