भोपाळमधील टीला जमालपुरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गणेश चौकातील एका स्नूकर क्लबमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकू आणि खंजीराने क्रूर हल्ला केला. ही संपूर्ण घटना अवघ्या ३० सेकंदात घडली आणि विद्यार्थ्यावर २७ वेळा चाकूने वार करण्यात आले. ही घटना १५ फेब्रुवारीच्या रात्री घडली, तर २२ फेब्रुवारीला सीसीटीव्ही फुटेज समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, फुटेजमध्ये दोन्ही आरोपी क्लबमध्ये घुसतात. थेट विद्यार्थ्याला लक्ष्य करून हल्ला करण्यास सुरुवात करतात. हा हल्ला इतका अचानक होता की, घटनास्थळी उपस्थित असलेले इतर विद्यार्थीही गोंधळून गेले. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या हाताला अनेक खोल जखमा झाल्या. एका मनगटाच्या १० हून अधिक जखमा झाल्या, तर दुसऱ्या हाताच्या दोन बोटांना गंभीर दुखापत झाली. त्याच्या खांद्यावर आणि पाठीवरही चाकूने वार करण्यात आले.
Delhi News: दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; आठ संशयितांना अटक, लाल किल्ल्यासह धार्मिक स्थळे लक्ष्यजखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, पीडित आणि आरोपी एकाच कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकतात. काही दिवसांपूर्वी स्नूकरक्लबमध्ये त्यांचे भांडण झाले होते. भांडणात पीडितने दोघांनाही थप्पड मारल्याचे वृत्त आहे. या रागाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. स्थानिकांचे म्हणणे आहे की, पूल गेममध्ये वर्चस्वावरून त्यांच्यात पूर्वी तणाव होता.
Army Dog Tyson Story : तीन दहशतवादी केले ठार! आर्मी डॉग टायसनच्या शौर्याची थरारक कहाणी; गोळी लागली तरी खचला नाही, पुढे जे झालं...या प्रकरणी टिला जमालपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मारहाणीच्या कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. नोटीस बजावल्यानंतर त्यांना नंतर त्यांच्या कुटुंबियांकडे सोडण्यात आले. वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोप वाढू शकतात असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत. वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत.