Tara Sutaria: ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अभिनेत्री तारा सुतारीया हिने तिच्या आयुष्यात नवी आणि सुंदर सुरुवात केली आहे. ताराने स्वतःचे पहिले घर खरेदी केले असून त्याची झलक तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नव्या घरासह 2026 वर्षाचे स्वागत तिने मोठ्या उत्साहात केले आहे. तिच्या या आनंदात चाहतेही सहभागी झालेले दिसत आहेत. अलीकडेच ताराच्या ब्रेकअपच्या बातम्या चर्चेत होत्या. मात्र आता अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ताराने तिचे पहिले घर विकत घेतले असून ते आपल्या खास स्टाइलमध्ये सजवले आहे. घराची सजावट तिच्या व्यक्तिमत्त्वाशी पूर्णपणे जुळणारी आणि आकर्षक अशी आहे.

ताराच्या या नव्या घरासाठी चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये रिया चक्रबोर्ती , दिशा पटनी आणि बादशाह यांचा समावेश आहे.

संगीताची विशेष आवड असल्याने ताराने घरात पियानोही ठेवला आहे. तिला पियानो वाजवणे खूप आवडते. तसेच घर सुंदर फुलं आणि कॅण्डल्सने सजवण्यात आले असून त्यामुळे घर अधिक आकर्षक आणि होमली वाटत आहे.

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, तारा लवकरच ‘Toxic’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत यश, कियारा आडवाणी, नयनतारा आणि हुमा कुरेशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडिया याच्यासोबत तारा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या. त्याआधी तारा कपूर कुटुंबातील आदर जैनसोबतही नात्यात होती, अशी चर्चा होती.
तारा सुतारिया हिने 23 फेब्रुवारी 2026 रोजी इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या घराची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली. या फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते प्रचंड आनंदी झाले. या झलकांमध्ये ताराचे घर अतिशय सुंदर, शांत दिसत आहे. अभिनेत्रीने घराच्या एका कोपऱ्यात पियानोही ठेवला असून तिला पियानो वाजवायला खूप आवडते.