Vijay Deverakonda relationship history before Rashmika: साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा कायम चर्चेचा विषय ठरला आहे. तो लवकरच रश्मिका मंदानासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. उदयपूरमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. वर्षानुवर्षे एकमेकांना डेटिंग केल्यानंतर, दोघेही लग्नाच्या बेडीत अडकतील. दरम्यान, दोघेही सध्या आपल्या लग्नामुळे चर्चेत आहेत. दरम्यान, विजयच्या आयुष्यात रश्मिका ही पहिली महिला नव्हती. काही वर्षांपूर्वी अभिनेत्याचे नाव एका परदेशी महिलेसोबत जोडले जात होते. रश्मिका आधी त्याची एक गर्लफ्रेण्ड होती, अशी माहिती आहे. दोघांचे रिलेशनशिपमध्ये असतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. विजयची एक्स नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
काही वर्षांपूर्वी विजय देवरकोंडा आपल्या कथित रिलेशनशिपमुळे चर्चेत आला होता. अभिनेता एका युरोपियन मॉडेलला डेट करत असल्याच्या अफवा इंटरनेटवर पसरल्या होत्या. रश्मिका मंदानासोबतचे त्याचे नाते सार्वजनिक होण्यापूर्वी, या अफवांनी चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. विजय आणि त्या परदेशी महिलेसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. दोघांचे एकत्रित फोटो पाहून इंटरनेटमध्ये खळबळ उडाली होती.
विजय देवरकोंडासोबत असलेल्या परदेशी महिलेचे नाव गिन्नी असे आहे. तिनं अभिनेत्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. मॉडेलने विजयच्या पालकांचीही भेट घेतली. दोघेही एकमेकांच्या पालकांना भेटले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मॉडेल ब्राझीलची आहे. दरम्यान, दोघेही रिलेशनशिपमध्ये होते की नाही? यावर अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कारण अभिनेत्याने कधीच यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. विजयने कधीच त्याचे नाते अधिकृत मान्य केले नाही. दरम्यान, दोघेही एकमेकांना डेट करत होते का? या प्रश्नाचं उत्तर समोर आलेलं नाही.
26 फेब्रुवारीला रश्मिका आणि विजय लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. दोघांनी एकत्र डिअर कॉम्रेड आणि गीता गोविंदमसारख्या चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली होती. दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आता ही केमिस्ट्री आपल्याला ऑफस्क्रीन देखील पाहायला मिळणार आहे. विजयने नेहमी आपले वैयक्तिक आयुष्य कायम खासगी ठेवले आहे. दरम्यान, आता विजय आणि रश्मिका लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार, ही माहिती उघड झाली आहे. दोघेही एका खासगी समारंभात राजस्थानमधील उदयपूर येथे लग्न करणार असल्याची माहिती आहे.