DGCA Action on VSR Ventures : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. VSR व्हेंचअर्सला मोठा दणका बसला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून चार लिअरजेट 45 विमानांच्या उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर या विमानांचं विशेष ऑडिट करण्यात आलं होतं. त्यामध्ये उणीवा आढळल्यामुळं या सर्व विमानांचं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय DGCA कडून घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लिअरजेट 40/45 या मॉडेलच्या चार विमानांना उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली आहे. या विमानांमध्ये उणीवा आढळल्यामुळं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय DGCA कडून घेण्यात आला आहे. यापूर्वी रोहित पवार.यांनी लिअरजेट विमानाच्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या. या विमानांचे उत्पादन अमेरिकेत होते. ही विमाने अमेरिकेत अनेक वर्ष वापरली गेली होती. त्यानंतर ती भारतात आणली होती असे रोहित पवारा यांनी सांगितले होते. याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.
DGCA च्या अहवालानुसार, विमानाच्या एअरवर्दीनेस म्हणजे उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष या अहवालातून देण्यात आला आहे. विमान प्रवासादरम्यान आवश्यक असलेल्या विमान सुरक्षा नियमांचं पालन केलं नाही. निष्कर्षाच्या आधारे व्हीएसआर कंपनीची चार लेअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं पालन केल्याशिवाय व्हीएसआर कंपनीच्या मालकीच्या VT-VRA, VT-VRS, VT-VRV, VT-TRI या चार विमानांची उड्डाणं करू नयेत असं या अहवालात म्हटलं आहे.