चास येथील सिद्धिविनायक मंदिराचा जीर्णोद्धार
esakal February 25, 2026 10:45 PM

चास, ता. २५ : चास येथे भीमानदीतीरावर एक छोटेसे सिद्धिविनायक व खंडोबाचे मंदिर आहे. हे मंदिर जागृत देवस्थान असल्याने अनेकांचे श्रद्धास्थान आहे. चास येथील बलदोटा परिवार हा या देवाचा भक्त असून १९७८ मध्ये सर्वप्रथम दगडूलाल बलदोटा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. दगडूलाल यांचे पणतू दिव्यांग पवन बलदोटा अमेरिकेच्या वॅाशिंग्टनमध्ये नोकरीला आहेत. चास गावचे सिद्धिविनायकाचे मंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत होते त्याचा जीर्णोद्धार करण्याची इच्छा त्यांना पुण्यामध्ये असलेले आजोबा चंदुलाल बलदोटा, वडील पवन बलदोटा, पंकज बलदोटा यांना सांगितली. त्यानुसार जीर्णोद्धार करण्यात आली.
रविवारी (ता. २२) मंदिर पूर्ण होऊन सिद्धिविनायक, खंडोबा, बाणाई, म्हाळसाई आणि नंदिसह शंकराची पिंड स्थापित करण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात मूर्तींची मिरवणूक, विधीवत पूजन तसेच मूर्तींची प्राणप्रतिष्ठा योगेश जोशी, सुहासचंद्र दस्तुरे, सखाराम जोशी, भूषण बर्वे, सुमीत कुलकर्णी, संतोष तेलंग, सुधीर चासकर यांच्या मंत्रोच्चाव्दारे करण्यात आली. तर स्वामी शिवदत्त महाराज यांच्या हस्ते कलशारोहण झाले. राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष चंदुलाल बलदोटा, पाणकोरबाई बलदोटा, मदनलाल बलदोटा, मन्सुखलाल बलदोटा, प्रवीण बलदोटा, रवींद्र खिवंसरा, मुकुंद भुजबळ याच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
यावेळी ॲड. मुकुंद आवटे, ज्ञानेश्वर करंडे, ॲड. गिरीष कटारिया, देवेंद्र पाटणकर, दिलीप बलदोटा, पंकज बलदोटा उपस्थित होते. मुकुंद पाठक, मुकुल पाठक, हेमंत जोशी, प्रथमेश जोशी, सूर्यकांत चासकर, चंद्रकांत चासकर, कुमार साठे, कांताराम ढमढेरे यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.