तलासरीतील शाळांचा जिल्हास्तरावर गौरव
esakal February 26, 2026 04:45 AM

तलासरीतील शाळांचा जिल्हा स्तरावर गौरव
तलासरी (बातमीदार) ः जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पालघर तसेच शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद पालघरच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात तलासरी तालुक्यातील विविध शाळांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, प्राचार्य संभाजी भोजने यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.
झरी धांगडपाडा क्र. २ तसेच जिल्हा परिषद शाळा कवाडा लिलकपाडा शाळेला शिक्षण उपक्रमांतर्गत ‘निपुण महाराष्ट्र सुपर शाळा’ म्हणून विशेष गौरव करण्यात आला. तसेच बा. विनोबा अॅप पाढे पाठांतर स्पर्धेत इयत्ता चौथी, पाचवी गटात जिल्हा परिषद शाळा कवाडा लिलकपाडा यांनी प्रथम क्रमांक पटकावत तालुक्याचा मान उंचावला. जिल्हा परिषद शाळा वेवजी सोनारपाडा येथील गुणवंत विद्यार्थिनी राधिका वांगडचा बिरसा मुंडा जिल्हा परिषद हॉल येथे जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थिनी म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच २०२५-२६ मध्ये पंचायत समिती तलासरी अंतर्गत जिल्हास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विधार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.