AKK26B05907
चपळगाव (ता. अक्क्लकोट) ः येथे आठवडा बाजारचा शुभारंभ करताना सरपंच वर्षा भंडारकवठे, अप्पासाहेब पाटील, उमेश पाटील व इतर.
चपळगावच्या पहिल्याच आठवडा बाजारात १५ लाखांची उलाढाल
अक्कलकोट, ता. २५ ः तालुक्याच्या उत्तर भागातील सर्वात मोठे गाव म्हणून चपळगावची ओळख आहे. शेजारीच असलेले कुरनूर धरण आणि पर्यायाने वाढलेले बागायतीचे क्षेत्र, वाढती लोकसंख्या, सोलर प्लॅन्टवर आलेले हजारो कामगारांची व्यवस्था व्हावी. तसेच स्थानिक शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांसाठी दर रविवारी चपळगावचा आठवडा बाजार सुरू करण्यात आल्याचे सरपंच वर्षा भंडारकवठे यांनी सांगितले. पहिल्याच आठवडा बाजारात पंधरा लाखांची उलाढाल झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या बाजाराचे उद्घाटन सरपंच वर्षा भंडारकवठे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच सुवर्णा कोळी होत्या. शिलान्यास माजी सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते झाले तर व्यासपीठावर निराणी ग्रुपचे रविकांत पाटील, उमेश पाटील, मार्केट कमिटीचे व्हा.चेअरमन अप्पासाहेब पाटील, ग्रामपंचायत अधिकारी विनोद डावरे उपस्थित होते.
चपळगावच्या बाजारात भाजीपाला, शेळी व्यापार, कापड, स्टेशनरी, चप्पल, किराणा, मसाला व्यापार, मांसाहारी, फळे, हॉटेल, कोल्ड्रिंक्सचा व्यापार झाला. यातून जवळपास पंधरा लाखांची उलाढाल झाली. बाजाराच्या यशस्वितेसाठी लिपिक उमेश सोनार, कर्मचारी पांडुरंग चव्हाण, विष्णुवर्धन कांबळे, यमुनाबाई गजधाने, अमोल गजधाने, रवी कोरे, मिनाज पटेल आदींनी परिश्रम घेतले.