तळंदगे : हातकणंगले तालुक्यातील तळंदगे येथील लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. याबाबत हातकणंगले अपर तहसीलदार यांनी सुनावणी घेतली.
यावेळी येथील सर्वच १३ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वासावर सहमती दाखवल्याने ठराव मंजूर करण्यात आला. अपर तहसीलदार यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत ठराव मंजूर केला.
विकास कामांवर पकड ठेवण्याचा प्रयत्नसरपंच पोळ यांच्यावर मनमानी कारभार, पदाचा दुरुपयोग आणि सदस्यांचा विश्वास गमावल्याचा आरोप प्रस्तावात करण्यात आला होता.
माजी सरपंच संजय भोजकर, सनतकुमार भोजकर तसेच माजी उपसरपंच राजेंद्र हवलदार यांच्या गटातील सर्व १३ सदस्यांनी एकमुखाने हा ठराव दाखल केला होता.
यापूर्वीही सनतकुमार भोजकर व अन्य सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करून सरपंचांना पदमुक्त केले होते.
Kolhapur Muncipal : गुंठेवारी नियमितीकरणाचा ठराव मंजूर; महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा,अजित पवार यांचे स्मारक वर्षभरात करण्याचाही ठरावमात्र, ग्रामविकास विभागाकडून स्थगिती मिळाल्यानंतर सरपंच व सदस्यांमध्ये वादाची ठिणगी कायम होती.
अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या सदस्यांमध्ये प्रमोद वाघमोडे, वर्षा भोजकर, विवेकानंद शिंगाडे, वीरेंद्र रूग्गे, दीपक सलगर, रंगराव धनगर, आयेशा मुल्लाणी, अर्चना माळी, सविता चौगुले, संध्या कांबळे, शुभांगी कांबळे, कमलाकर पालके आणि आकाश येताळे यांचा समावेश आहे.