कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ठराव संकलन प्रक्रिया ९ मार्चपासून सुरू होणार असून, तालुकानिहाय संस्थांची यादी २ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी दिले आहेत. ४ मे २०२६ रोजी विद्यमान संचालकांची मुदत संपत असून, तीच अर्हता तारीख निश्चित करण्यात आली आहे. ४ मे २०२३ पूर्वी सभासद झालेल्या संस्थाच मतदानासाठी पात्र असतील. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकतींसाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर एका महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
Amravati: टॉमेटो-वांग्याचे भाव कोसळले; शेतकरी आर्थिक अडचणीत..अमरावती भाजी बाजारात टमाटर आणि वांग्याची आवक वाढल्याने दर अक्षरशः कोसळले आहेत. बाजारात टमाटर १० रुपये किलोने विकला जात असला तरी शेतकऱ्यांच्या हातात फक्त ३ ते ४ रुपये किलो दर पडत आहे. एकरी १ ते १.५ लाख खर्च करून सहा महिने घाम गाळलेल्या शेतकऱ्यांना आता खर्चही निघणे कठीण झाले आहे. दिवाळीनंतर ४० रुपये किलोने गेलेला टमाटर आज कवडीमोल दरात विकण्याची वेळ आली आहे.वांग्यालाही शेतातून ४ ते ५ रुपये किलो दर मिळत असून एकरी ६० ते ७० हजार खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तोडणी, हमाली, दलाली, वाहतूक खर्च वजा करता हातात काहीच राहत नाही.अधिक आवक आणि कमी मागणीचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून तातडीने शासनाने हस्तक्षेप करून आर्थिक मदत द्यावी, अशी संतप्त मागणी होत आहे.
Pune-Satara: पुणे - सातारा महामार्गावर रात्री अपघातपुणे - सातारा महामार्गावर सोरोळा गावाच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास, कंटेनर डिव्हायडरला धडकून अपघात झाल्याची घटना
कंटेनर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून कंटेनर डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती
सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी नाही.. अपघातानंतर कंटेनर पलटी होता होता वाचल्यानं दुर्घटना टळली
मात्र या अपघातानंतर रस्त्यावर कंटेनरमधील ऑइल रस्त्यावर सांडल्याने काही काळ याठिकाणची वाहतूक मंदावली होती..
विधान परिषद निवडणूकित पक्ष माझ्यावर विश्वास दाखवेल - प्रवीण पोटे पाटीलज्या दिवशी विधान परिषद निवडणुका जाहीर होतील, त्या वेळी भारतीय जनता पार्टी पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवेल आणि मी निवडणुकीला सामोरे जाईन, असा ठाम विश्वास भाजपा नेते माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी व्यक्त केला आहे.ते म्हणाले की, २०१२ मध्ये त्यांनी प्रथमच विधान परिषद निवडणूक लढवली आणि त्या वेळी चांगल्या मतांनी विजय मिळवला. त्यानंतर २०१७-१८ मध्येही भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली आणि ते पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून आले. पुढे मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळून पाहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.आपल्या कार्यकाळात पारदर्शक आणि विकासाभिमुख कामकाज केले असल्याचा दावा करत, येत्या विधान परिषद निवडणुकीत पक्ष पुन्हा संधी देईल, याबाबत कोणतीही शंका नसल्याचेही पोटे पाटील यांनी स्पष्ट केले.
Latur: लातूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक लुटण्याचा प्रयत्न, सायरन वाजल्याने चोरीचा डाव फेलरेनापुर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत मध्यरात्री चोरट्याने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, चोरी करण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने बँकेतील लोखंडी दरवाजे तोडून तिजोरीपर्यंत पोहोचले, मात्र तिजोरी जवळील सायरन वाजल्याने , चोरटे चोरी करण्यासाठी आणलेल साहित्य जागीच टाकून पसार झाले आहेत. तो बँकेत रात्रीच्या वेळी पहाऱ्यावर असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना मारहाण करून हातपाय बांधून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, मात्र हा सगळा प्रयत्न अत्याधुनिक पद्धतीच्या सायऱ्यांमुळे फेल गेला आहे, श्वान पथकाच्या साह्याने अधिकचा तपास पोलीस करत आहेत..
Washim: वाशिमच्या बाजार समितीमध्ये तुरीचे दर घसरलेवाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांत तुरीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत अवघ्या वीस दिवसांपूर्वी तुरीला प्रतिक्विंटल सुमारे 9 हजार रुपयांचा दर मिळत होता. सध्या वाशिम बाजार समितीत तुरीला केवळ 7 हजार 800 रुपये पर्यंतचे दर मिळाले. तर रिसोड बाजार समितीमध्ये 7 हजार 900 रुपयांचे दर मिळाले,असून कारंजा बाजार समितीमध्ये तुरीला 8 हजार रुपयांचे दर मिळाल्याने जवळपास एक हजार ते बाराशे रुपयांची घसरण झाली आहे. बाजारात तुरीची आवक वाढत असताना दरात सातत्याने घट होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Pune: पुणेकरांनो वाहनांवरील थकीत दंडभरा अन्यथा लायसन्स रद्द होणारपुणेकरांनो वाहनांवरील थकीत दंडभरा अन्यथा लायसन्स रद्द होणार
वाहतूक पोलिसांनी दंड थकवणाऱ्या विरोधात कारवाईचा उगारला बडगा
३० दिवसांच्या आत दंड जमा न केल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार
पुणेकरांनी दंड भरण्यासाठी चौकात वाहतूक नियमानासाठी थांबलेल्या पोलिसमसदाराकडे दंड जमा करावा; वाहतूक पोलिसांचा पुणेकरांना आवाहन
वाहन मालकांना लायसन्स रद्द होण्याची येणार नोटीस
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर अधिकृत शॉट कोडवरून एसएमएस द्वारे नोटीस पाठवण्यात येणार
26,27,28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या कालावधीत या सगळ्या नोटीसा पाठवण्यात येणार..
Buldhana: जानेफळमध्ये डीपीला भीषण आग; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचे मोठे नुकसान..बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे महावितरणच्या डीपीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आठवडी बाजाराच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रोड क्रॉस वीजवाहिनीला जड वाहनाचा धक्का लागून शॉर्टसर्किट झाल्याने डीपी पेटली आणि केबल व फ्युज बॉक्स जळून खाक झाले... सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, उपकेंद्रातील अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
Kalyan-Ahilyanagar: कल्याण- आहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघातपिकअप मालवाहू गाडी आणि जीपची जोरदार धडक होऊन १० जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी पिकअप गाडीत कलिंगड भरलेले होते. धडकेनंतर कलिंगड महामार्गावर विखुरल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे
Karnatak: कर्नाटकच्या आडमुठ भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचितकर्नाटकच्या आडमुठ भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित
उजनी धरणातून सोडलेले पाणी कर्नाटकने आडवल्याने महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित
कर्नाटक सरकारने भीमा नदीवर उमराणी गावाजवळ नव्याने उभारलेल्या बंधाऱ्यामुळे महाराष्ट्रातील 9 गावांना फटका
उमराणी गावाजवळ 1 टीएमसी पाणी अडवल्याने दक्षिण सोलापूर, अक्कलकोटअधिक शेकडो हेक्टर शेती धोक्यात
आमच्या लोकप्रतिनिधीना आमची विनंती आहे की हा विषय अधिवेशनात मांडून शेतकऱ्यांना पाणी मिळवून द्यावे.
कर्नाटक सरकार हुकूमशाही करत आहेत त्यामुळे आपल्या सरकारने लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा.
Amravati: अमरावतीत स्वीकृत नगरसेवकांकडून अल्पसंख्यांक काँग्रेस सेलमध्ये नाराजीअमरावती महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षामधून दोन स्वीकृत नगरसेवक निवडण्यात आले, मात्र अमरावती शहर काँग्रेसमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून अंतर्गत नाराजी उफाळली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव आसिफ तक्कल यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत पक्ष एक-दोन लोकांच्या निर्णयाने चालू शकत नाही, असे म्हटले आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारे विचारणा केली गेली नाही, त्यामुळे या निर्णयाबाबत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.. नुकताच अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली
Kokan: कोकणात पोलिसांनी नाचवली पालखीकोकणात सध्या शिमगा उत्सवाचे वेध लागले असून गावातील पालख्या आता रत्नागिरी शहरात ठीक ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रत्नागिरी शहरा नजीकच्या मिरजोळी येथील श्री कालिका देवाची पालखी आली असता ती पालखी पोलीस स्थानकातील पोलिसांनी खांद्यावर घेऊन नाचवली. यावेळी ही पालखी नाचवताना महिलांचा देखील सहभाग होता.
Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतीवर आज पासून प्रशासकराजयवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपला असून निवडणूक होईपर्यंत या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले जाणार आहे शासनाने सरपंचाची प्रशासक म्हणून निवड करावी असे आदेश काढले होते, त्या अनुषंगाने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी आदेश काढले असून तसे पत्र गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर बीडीओ प्रशासकांची नेमणूक करणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नागपूर विभागाने परीक्षा व्यवस्थेत केला बदल..नागपुरातील बारावी पेपरफुटी प्रकरणानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नागपूर विभागाने परीक्षा व्यवस्थेत केला बदल..
सर्व परीक्षा केंद्रावर सीलबंद प्रश्नपत्रिकेचे बॉक्स पेपरच्या वेळेत 11 वाजताच उघडली जाणार..
यापूर्वी विद्यार्थ्याना प्रश्नपत्रिका वाचनासाठी 10 मिनिटे आधी पेपर दिला जायचा. आता ही पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे..
तसेच उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी 2 वाजता ऐवजी 2 वाजून 10 मिनिटांनी वेळ निश्चित करण्यात आली.
कस्टोडियनकडून केंद्रप्रमुखापर्यंत प्रश्नपत्रिका पोहचवण्याचा कालावधी आता 10 ते 15 निश्चित करण्यात आला आहे..
भविष्यात पेपर फुटीच्या घटना टाळण्यासाठी शिक्षण मंडळाकडून कडक उपाय सुरू करण्यात आले आहे.
पेपरफूटी प्रकरणानंतर भरारी पथकात वाढ, पूर्वी 6 भरारी पथक तैनात होती. आता वाढवून 8 पथक करण्यात आली आहे...
Maharashtra Live News Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल २५ मिनिटे उशिरामध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल 30 ते 35 मिनिटांनी उशिराने धावत आहेत. विक्रोळी स्थानकात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन विक्रोळी स्थानकात थांबल्या आहेत.