चाकण, ता. २४ : संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाचे आयोजन सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
या अभियानाअंतर्गत पुणे नाशिक महामार्गावरील संतोषनगर भाम येथील भामा नदी स्वच्छ करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत चाकण येथे चक्रेश्वर स्मशानभूमी, भीमा नदी काठ येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
हा उपक्रम केवळ पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न नसून अध्यात्म, सेवा, सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर संगम होता.
स्वच्छता अभियान झाल्यानंतर त्याच ठिकाणी सत्संगाचे आयोजन केले होते. त्यामधून बाहेरील स्वच्छतेबरोबरच मनाच्या आंतरिक शुद्धीचा संदेश देण्यात आला. चाकण शाखेचे मधुकर गोसावी यांनी सर्व सेवादारांचे आभार मानले.