काँग्रेस की भाजप? अरविंद केजरीवाल यांच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा राजकीय फायदा कुणाला?
esakal February 27, 2026 09:45 PM

दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात न्यायालयाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना निर्दोष मुक्त केले आहे. केजरीवाल आणि सिसोदिया यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे न्यायालयानं म्हटलं. या निकालानंतर अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केजरीवाल भावुक झाल्याचंही बघायला मिळालं. दरम्यान, आता केजरीवाल यांना मिळालेल्या क्लीनचिटनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. केजरीवाल यांच्या बाहेर येण्याने भाजपाला राजकीय फायदा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

२०१२ मध्ये स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचा सध्या दिल्ली, पंजाब, गुजरात, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये राजकीय प्रभाव आहे. पंजाबमध्ये आपची सत्ता आहे, तर गुजरातमध्ये आम आदमी पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. राजधानी दिल्लीमध्ये मात्र आम आदमी पक्ष सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. अशातच पुढील दोन वर्षांत गुजरात, पंजाब, गोवा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल जोरदारपणे मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

Kolhapur Muncipal Election : काँग्रेसची मते वाढली, भाजपचा हिट रेशो वाढला; महापालिकेचं राजकीय गणित उघड

महत्त्वाचे म्हणजे या चारही राज्यात आम आदमी पक्षाचा काही प्रमाणात प्रभाव आहे. पंजाब आणि हिमाचलमध्ये आपची थेट लढत काँग्रेसशी आहे. गोवा आणि गुजरातमध्ये जरी भाजप सत्तेत असला, तरी येथे काँग्रेसही तुलनेने मजबूत आहे. त्यामुळे या दोन राज्यांतही आपची थेट लढत भाजपशी नाही. त्यामुळे केजरीवाल यांच्या क्लीनचिटमुळे भाजपला थेट राजकीय नुकसान होण्याची शक्यता तशी कमी आहे.

या उलट केजरीवाल यांच्या बाहेर येण्याचा फटका काँग्रेसलाच बसणार असल्याची चर्चा आहे. गुजरात आणि गोवा सारख्या राज्यांमध्ये आपचा प्रभाव वाढल्यास काँग्रेसच्या मतांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला एकतर्फी विजय मिळाला होता. या विजयात आपच्या मतांच्या टक्केवारीचाही मोठा वाटा असल्याचे मानले जाते. २०२२ मध्ये भाजपला ५२.५० टक्के, काँग्रेसला २७.२८ टक्के आणि आम आदमी पक्षाला सुमारे १३ टक्के मते मिळाली होती.

Akola Election Analysis : अकोला महापालिकेत कुणाला मिळेल ‘लाडक्या बहिणींची’ साथ? भाजपासह राष्ट्रवादी-शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला!

याशिवाय २०२१७ च्या निवडणुकीत भाजपला ४१.१ टक्के आणि काँग्रेसला ४१.४ टक्के मते मिळाली होती, तर आपला मतांचा वाटा केवळ ०.१ टक्के होता. म्हणजेच २०१७ च्या तुलनेत २०२२ मध्ये आपला मिळालेल्या मताचा काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला होता. परिणामी काँग्रेसच्या जागा ७७ वरून २७ वर आल्या, तर भाजपच्या जागा ९९ वरून वाढून १५६ झाल्या होत्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.