पिंपरी, ता. २६ ः चिंचवड येथे कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला...सागरा’ या अजरामर काव्याचे सामूहिक गायन झाले.
विद्यार्थ्यांनी ‘मला समजलेले सावरकर’ या विषयावर भाषणे केली. शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला चौधरी व शिक्षिका लता डेरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. मनीषा डोंगर दिवे यांनी सूत्रसंचालन केले.