धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी
Saam TV February 28, 2026 08:45 PM
  • बीडमध्ये पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळला.

  • धनंजय मुंडे समर्थकाकडून सोशल मीडियावर धमकीची पोस्ट.

  • मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना लक्ष्य केल्याचा आरोप.

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. त्याचदरम्यान धनंजय मुंडेंच्या समर्थकाने आमदार सुरेश धससह जरांगे पाटील यांना धमकी दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

वाल्मिक कराडच्या मुलाच्या पोस्टवरून नवा वाद; धनंजय देशमुख भडकले, काय म्हणाले? वाचा

परळीतील आमदार धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड यांनी आमदार सुरेश धस आणि मनोज तरंगे यांना फेसबुकवरून धमकी दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर मनोज जरांगे आणि सुरेश धस यांचा खेळ खल्लास, अशी धमकी गोविंद फड यांनी दिली आहे. परळीतील आमदार धनंजय मुंडे समर्थक गोविंद फड यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून फेसबुक पोस्ट केली आहे. एकीकडे वाल्मीक कराडच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत असताना फड यांनी धमकीची पोस्ट केली आहे.

Rajya Sabha: मोठी बातमी! राज्यसभेसाठी मुंडे यांचे नाव चर्चेत; ऐनवेळी भाजपच्या गोटात बदलाचे वारे,पडद्यामागे घडतंय काय?

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस यांचा खेळ खल्लास, भंडारा लावून बोलतोय,” अशा आशेची पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी फेसबुकवर केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

गोविंद फड यांच्या पोस्टने मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर समर्थक आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. गोविंद फड यांनी फेसबुक पोस्टमध्ये थेट नावे घेत जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना इशारा दिलाय. वाल्मिक कराड याच्या मुलाची सुशील कराडची एक सोशल मीडियावरची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार असं त्याने म्हटलं आहे. या पोस्टमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.