>> नीलिमा प्रधान
जाळी – स्पर्धेत पुढे जाल
मीनेत शुक्र राश्यांतर, चंद्र बुध प्रतियुती. महत्त्वाची कामे पूर्ण करा. आळस नको. भावनेच्या भरात आहारी जाऊ नका. नोकरीधंद्यात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. गुप्त कारवायंवर नजर ठेवा. स्पर्धेत पुढे जाल. शुभ दिवस. ६, ७
वृषभ नवीन संधी मिळेल
मीनेत शुक्र राश्यांतर, चंद्र शुक्र प्रतियुती. तुमच्या क्षेत्रात अग्रेसर राहाल. नवीन संधी मिळेल. परिचय वाढेल. नोकरीधंद्यात वाढ होईल. परदेशी जाण्याचा योग. कलाक्षेत्रात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांना खूष कराल. शुभ दिवस. ४, ५
मिथुन – नोकरीत बदल होईल
मीनेत शुक्र राश्यांतर, चंद्र, बुध प्रतियुती. प्रत्येक दिवस यश देणारा ठरेल. निश्चित दिशा ठरवा. नोकरीत योग्य बदल होईल. धंद्यात वाढ होईल. योग्य गुंतवणूक करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गजांचा सहवास लाभेल. शुभ दिवस. 1, 7
कर्करोग – गैरव्यवहारात फसू नका
मीनेत शुक्र राश्यांतर, सूर्य चंद्र षडाष्टक योग. आत्मविश्वास, उत्सह यावर नियंत्रण ठेवा. वाहनापासून धोका जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कुणालाही कमी लेखू नका. वाद वाढवू नका. अहंकाराने अपमान होईल. शुभ दिवस. ४, ५
सिंह – प्रवासात सावध रहा
मीनेत शुक्र राश्यांतर, चंद्र बुध प्रतियुती. कठीण, महत्त्वाची कामे मंगळवार नंतर करा. प्रवासात धोका पत्करू नये. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, समाजिक क्षेत्रात गोड बोलणारेच कारस्थान रचतील. शुभ दिवस. ४, ५
कन्या – संयमाने वागा
मीनेत शुक्र राश्यांतर, सूर्य चंद्र षडाष्टक योग. तुमच्या क्षेत्रात संयमाने वागा. कायद्याच्या कक्षेत राहून कामे करा. प्रकृतीची काळजी घ्या. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. नोकरीत चूक टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. शुभ दिवस. ६, ७
तूळ – प्रगतीकारक घटना घडतील
मीन राशीत शुक्र राश्यांतर, चंद्र बुध प्रतियुती. तुमच्या क्षेत्रात प्रगतीकारक घटना घडतील. किचकट प्रश्न रेंगाळत ठेऊ नका. नोकरीधंद्यात चांगला बदल घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य दिशेने कार्य करता येईल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. शुभ दिवस. 1, 7
वृश्चिक – वादाला महत्त्व देऊ नका
मीन राशीत शुक्र राश्यांतर शुक्र हर्षल लाभयोग. कोणताही प्रश्न सोडवताना गोड बोला. वादाला महत्त्व देऊ नका. राग वाढेल. प्रवासात चौफेर सावध रहा. नोकरीत व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आश्वासन देऊ नका. संयम ठेवा. शुभ दिवस. 1, 5
धनु – ध्येय साध्य कराल
मीन राशीत शुक्र राश्यांतर, चंद्र गुरू लाभयोग. अडचणींवर मात करून ध्येय साध्य कराल. वेळेचा सदुपयोग करा. नोकरीत कठीण काम करण्याच्या वृत्तीचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांना योग्य उत्तर द्याल. शुभ दिवस. ५, ६
मकर – अडचणींतून मार्ग शोधा
मीन राशीत शुक्र राश्यांतर चंद्र बुध प्रतियुती. अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. शत्रू व मित्र यांच्यातील फरक कळेल. स्पष्ट बोलताना काळजी घ्या. धंद्यात खर्च उद्भवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संतापजनक अनुभव येतील. शुभ दिवस. 1, 5
कुंभ – ध्येय गाठता येईल
मीन राशीत शुक्र राश्यांतर, चंद्र, गुरू लाभयोग. चिकाटी ठेवल्यास तुमचे ध्येय गाठता येईल. राग वाढवणारी घटना घडेल. प्रवासात सावध रहा. जुना वाद समोर येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. अधिकार लाभतील. शुभ दिवस. ३, ७
मीन – तटस्थ भूमिका घ्या
स्वराशीत शुक्र राश्यांतर, चंद्र मंगळ प्रतियुती. तुमच्या बोलण्याचा गैरअर्थ काढला जाईल. साडेसाती चालू आहे. सावध रहा. योग्य भाषा वापरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. गुप्त कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. शुभ दिवस. 1, 5