विवाहितेशी सोशल मीडियावर ओळख, मैत्रीतून प्रेमसंबंध; बोलायची बंद झाल्यानं गोळी झाडून हत्या, स्वत:लाही संपवलं
esakal March 01, 2026 11:45 PM

चोपडा अकुलखेडा (ता. चोपडा) येथील शिरपूर रस्त्यावरील वसाहतीत ३५ वर्षीय प्रियकराने ३० वर्षीय प्रेयसीच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडून तिचा खून केला व स्वतः त्याच बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. २८) सकाळी अकराला घडली. जगदीश काशीनाथ पाटील (३४) यांच्या फिर्यादीवरून मृत देवानंद धनगरच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकुलखेडा येथील अनिता (वय ३०, रा. निगव्हाण, ह. मु. अकुलखेडा) यांची भामपूर येथील देवानंद सुभाष धनगर (वय ३५, ता. शिरपूर) याच्याशी साधारणतः दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून ओळख झाली होती. दोघांची चांगली मैत्री झाल्यानंतर काही दिवसातच त्यांच्यात मैत्री निर्माण होऊन त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरु असताना गेल्या काही दिवसांपासून अनिता या देवानंद याच्याकडे दुर्लक्ष करीत होती.

Nashik Crime : दुसऱ्याशी बोलत असल्याचा संशय, अल्पवयीन प्रेयसीला संपवलं; १९ वर्षीय तरुणासह त्याच्या मित्राला अटक

या गोष्टीचा रागातून शनिवारी (ता. २८) सकाळी ११ वाजताच्या सुमारास देवानंद याने रागाच्याभरात अकुलखेडा येथे अनिताच्या घरी गाठले. याठिकाणी त्याने सोबत आणलेल्या गावठी कट्टधामधून एक गोळी अनिताच्या डोक्यावर झाडून तिचा खून केला. त्यानंतर त्याच बंदुकीतून स्वतःच्या डोक्यात देखील गोळी झाडली. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत त्यांनी दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांनी मृत देवा धनगर याची दुचाकी आणि गावठी कट्टा हस्तगत केला आहे. अनिता व देवानंद दोघेही रक्ताच्या थारोळ्यात घरात असताना अनिता पाटील यांची मुलगी तनुजा पाटील ही शिकवणी करून घरी आली. तिने आईला दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. मात्र, घराचा दरवाजा उपडत नसल्याने तिने खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला.

घरात आईचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पाहून तनुजाने लगेचच अनिता पाटील यांच्या मोबाईलवरून जगदीश पाटील यांना फोन करून घटना सांगितली. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेव घोलप व शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावळे यांनी धाव घेतली. अधिक तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे करीत आहेत.

Chh. Sambhajinagar: गादीत गुंडाळून लावत होते मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट; तीसगाव परिसरातील घटना, आईसह सावत्र वडील ताब्यात दुर्लक्ष केल्याचा राग

अनिता या जगदीश पाटील यांच्याबरोबर दहा ते बारा वर्षांपासून अकुलखेडे गावात वास्तव्यास होत्या. देवानंद याच्याशी प्रेमसंबंध असतानाच त्या काही दिवसापासून त्याच्याशी बोलत नव्हत्या. प्रेयसी आपल्याशी पूर्वीसारखी बोलत नाही, प्रतिसाद देत नाही, टाळाटाळ करीत असल्याच्या रागातून देवानंद याने अनिताचा गोळी झाडून खून केला असावा, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.