इराकमधील तणावानंतर यूएईमध्ये, विशेषतः Dubai आणि Abu Dhabi येथे गेलेले कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० ते ११० पर्यटक सध्या सुरक्षित आहेत. काही विद्यार्थी Georgia येथील विद्यापीठात जाण्यासाठी निघाले होते. त्यांचे विमान Sharjah मार्गे असल्याने ते शारजाह विमानतळावर असताना ही परिस्थिती निर्माण झाली. सध्या सर्व पर्यटक सुरक्षित असून त्यांच्या जेवणाची, राहण्याची आणि फिरण्याची योग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. विमानाची तिकिटे एक-दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली असून व्हिसाही वाढवण्यात आला आहे. पर्यटक लवकरच पर्यायी मार्गाने कोल्हापूरकडे परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे बळीराम वराडे यांनी दिली आहे.
कल्याणच्या बाजारपेठांमध्ये होळी आणि रंगपंचमी निमित्त खरेदीची लगबगहोळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरातील बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. धुलिवंदन आणि रंगपंचमीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले आहेत. होळी सणासाठी लागणारे एम गौऱ्या, पेंढा तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. तर रंगपंचमीसाठी लहान मुलांमध्ये पिचकारी, रंगीबेरंगी बंदुका आणि विविध प्रकारचे रंग घेण्याचा उत्साह दिसून येत आहे.
गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु, चारचाकी वाहनासह एकूण 12,21,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्तगडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन आज दिनांक 01/03/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पथकाने सापळा रचून अवैद्य दारूची वाहतुक करणाया आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.
दुबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला पुढाकारअमेरिका इजराइल आणि इराण युद्धामुळे दुबई शहरात पिंपरी चिंचवड शहरातील इंदिरा कॉलेजचे 84 विद्यार्थी आणि चार शिक्षक अडकून बसले आहेत. या विद्यार्थी आणि शिक्षकांना मदत मिळावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आता पुढाकार घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने इंदिरा कॉलेज कडून 84 विद्यार्थी आणि चार शिक्षकांची संपूर्ण माहिती मागवली असून ती माहिती ते आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालय आणि दुबई येथील भारतीय दूतावासाला देणार आहेत. त्यानंतर हवाई सेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांना आपल्या देशात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
राज्यातल्या नद्या प्रदूषणावरून जलसंपदा मंत्र्यांनी प्रदूषण महामंडळाला फटकारलंराज्यातील नद्यांच्या वाढत्या प्रदूषणावरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रदूषण महामंडळाला फटकारत थेट महापालिकांना इशारा दिला आहे.नदी प्रदूषण रोखण्याचे काम दुर्दैवाने प्रदूषण महामंडळाकडून होत नाही, पण यापुढे अगदी प्रदूषण रोखण्यासाठी जलसंपदा विभागाकडूनच पुढाकार घेण्यात येणार असून ज्या महापालिकेला नदीतून पाणी देण्यात येतं,त्या महापालिकेकडुन जेवढ्या प्रमाणात सांडपाणी स्वच्छ करून नदीत सोडण्यात येईल तेवढेच पाणी त्या -त्या महापालिकेंना देण्यात येईल,असे पत्र पाठवण्यात येणार,अशी भूमिका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केली आहे.महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नद्यांचे प्रदूषण वाढत आहे, त्यामुळे जलसंपदा विभागाकडूनच पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा उभी करण्याच्या विचाराधीन असल्याचंही मंत्री विखे पाटलांनी स्पष्ट केलंय ते सांगलीच्या बेळंकी या ठिकाणी बोलत होते
गुरु-संतांच्या आशीर्वादाने कार्य; 1984 शीख दंगल प्रकरणे उघडून न्यायाचा प्रयत्न – पंतप्रधान नरेंद्र मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी
गुरु आणि संतांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहेत
१९८४ ला शीख दंगल झाली त्यात अनेकांनावर अन्याय झाला होता त्या सर्व फाईल ओपन करून न्याय देण्याचा प्रयत्न केला
जम्मू कशमीर ला शीख बाधवना सेवा देण्याचा प्रयत्न केला
नवीन पिढी जेव्हा जोडली जाते तेव्हा भविष्याचा मार्ग बनते
चिंचवडच्या जैन मंदिरात चांदीचे मुकुट चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी 48 तासात ठोकल्या बेड्यापिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड येथील आदेश्वर जैन मंदिर येथे भगवान श्री आदेश्वर शंकेश्वर पार्श्वनाथ यांच्या मूर्तीचे जवळपास एक किलोग्रॅम वजनाचं चांदीचे मुकुट एका अज्ञात चोरट्यांनी पुजाऱ्याच वेश धारण करून चोरी केलं होत. या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाख क्रमांक एक पथकाने जवळपास 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून चांदीचा मुकुट चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. नरेश अगरचंद जैन वय 49 वर्ष राहणार मुंबई असं जैन मंदिरात चांदीच मुकुट चोरी करणाऱ्या रेकॉर्ड वरील चोरट्याच चे नाव आहे. तसेच त्याच्या विरोधात मुंबई परिसरात जवळपास 12 चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्री हार्डवेअरच्या दुकाना लागली भीषण आगपिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरातील विशाल नगर येथे काल रात्री 11 वाजता दरम्यान एका हार्डवेअर दुकानाला भीषण आग लागली होती. या आगीत हार्डवेअर चे दुकान पूर्णपणे जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने हार्डवेअरच्या दुकानावर जोरदार पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली आहे. मात्र या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
चेंबूर नाका येथे संक्रमण शिबिराला भीषण आगचेंबूर नाका येथील एका खाजगी विकासाच्या संक्रमण शिबिराला रविवारी दुपारी सुमारे पावणेचारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत तीन ते चार घरांमधील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
धुळ्यातील विमा कंपनीचे कर्मचारी दुबईमध्ये अडकलेधुळ्यातील विमा कंपनीचे कर्मचारी दुबईमध्ये अडकल्याची माहिती आली समोर
आम्ही सर्व हॉटेलमध्ये सुखरूप आहोत अशी माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी दिली
परंतु प्रशासनाने या सर्व कर्मचाऱ्यांना हॉटेल बाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत
संबंधित कर्मचारी कंपनीच्या टूर साठी गेले असल्याची माहिती
या कर्मचाऱ्यांची दुबई मधून कधी सुटका होणार हे बघणं औचित्याच ठरणार
सुनेत्रा पवार यांच्यावर एक मोठी जबाबदारी; पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्तीपुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष पदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती
मंडळाच्या सभासदांनी आज केली बिनविरोध निवड
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर जबाबदारी
Sangli: सिंचन योजनांच्या नावाखाली जाणता राजाने फक्त निवडणुका केल्या, राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर निशाणासांगली -
राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर निशाणा
सिंचन योजनांच्या नावाखाली जाणता राजाने फक्त निवडणूका केल्या
फक्त लोकांना मृगजळ दाखवण्याचं काम केलं,
सिंचन योजनांचे केवळ भूमिपूजन जाणता राजाकडून करण्यात आलं
सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेळंकी येथे मैशाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या बोगदा कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते
Dombivali: डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेज परिसरात महानगर गॅसची पाईप लाईन लिकेजडोंबिवली-
डोंबिवली खंबाळपाडा भोईरवाडी परिसरात मॉडेल कॉलेज परिसरात महानगर गॅसची पाईप लाईन लिकेज
परिसरात भीतीचे वातावरण
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Nagpur: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्फोट झालेल्या कंपनीची केली पाहणीनागपूर -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राहुल गाव परिसरात झालेल्या एसबीआय कंपनीच्या परिसरात जाऊन पाहणी केली
कामगारांच्या समस्या जाणून घेत कंपनी मालकाशी फोनवर जाऊन चर्चा केली...
यावेळी त्यांनी कंपनी मालकाला त्यांचे खालचे प्लांट वरील अधिकारी उडवाउडूचे उत्तर देत असल्याचे सांगा तुम्ही स्वतः या आणि प्रत्येक मृतकाच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी लावून धरली
यावेळी त्यांच्यासोबत त्या भागातील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुनीता गावंडे ही उपस्थित होत्या... त्यांनीही कंपनी मालकाशी चर्चा केली...
तसेच नागपूर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात जाऊन भेट घेतली...
Hingoli: हिंगोली शहरात उभी असलेल्या कारने घेतला अचानक पेटहिंगोली -
हिंगोली शहरात उभी असलेली कार अचानक पेटली
जीवितहानी नाही मात्र परिसरात आगीचे लोट
हिंगोली पालिकेच्या पथकाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू
Solapur: उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेले पाणी अक्कलकोटमध्ये पोहचलेसोलापूर -
- उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेले पाणी अक्कलकोट तालुक्यात झाले दाखल.
- दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आले होते पाणी
- अक्कलकोट तालुक्यातील आळगी बंधाऱ्यावर पोचलं पाणी.
- औंज बंधारा भरण्यासाठी उजनीतून भीमा नदी पात्रात चार हजार सहाशे क्युसेस पाणी सोडण्यात आली..
- भीमा नदी काठच्या गावांना जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा..
Pune: जिल्हा परिषद सदस्य निवडीचा अधिकार पूर्णपणे सुनेत्रा वहिनींना - दत्तात्रेय भरणेदत्तात्रेय भरणे -
जिल्हा परिषद सदस्य निवडीचा अधिकार पूर्णपणे सुनेत्रा वहिनींना
वाहिनी ठरवतील तो गटनेता लवकरच निवडला जाईल
पुणे जिल्हा परिषद निवडणूक आदरणीय अजित पवारांच्या नेतृत्वाखाली लढलो पुणे जिल्ह्याने मोठा कौल दिला
यापुढे सुनेत्र वहिनींच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य उत्तम काम करून दाखवतील
सांगलीत औषधांच्या नावाखाली गोवा बनावट देशी दारूची तस्करीऔषधांच्या नावाखाली सुरू असलेली अवैध देशी दारूची तस्करी सांगली मध्ये कारवाई करण्यात आली आहे.मिरज-पंढरपूर महामार्गावर राज्य उत्पादन शुल्कने सापळा रचून 41 लाखांच्या गोवा बनावटीच्या देशी दारूसह 71 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.गोव्यातून चोरट्या मार्गाने नागपूरकडे देशी बनावटीची दारू तस्करी करण्यात येत आजची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक कारवाई केली आहे, यामध्ये 1 हजार 50 देशी बनावटीचे गोवा बनावटीचे दारूचे बॉक्स जप्त करत चालकाला अटक करण्यात आली आहे. बनावट औषध चलन आणि बनावट गाडीचे नंबर वापरून सदर दारूची तस्करी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परांड्यात ड्रग्स तस्करीधाराशिव जिल्ह्यातील परांड्यात ड्रग्स तस्करी, 20 पुड्या जप्त - धाराशिव पोलिसांची कारवाई
परंडा पोलिसांनी परंडा ते मुंगशी जाणाऱ्या रोडवर गफार मुजावर यांच्या शेताजवळ केली कारवाई
गारभवानी इंद्रा नगर झोपडपट्टी येथील बालाजी नवनाथ सोनवणे याला केली पोलिसांनी अटक
पोलिसांनी 20 पॉलीथिनीची पिशवी त्यामध्ये 14.5 ग्राम एमडी ड्रग्ज पावडर केली जप्त, 15 हजार प्रति ग्रामनुसार 2 लाख 17 हजार रुपये किंमतीचा ड्रग्स जप्त
ड्रग्जचे मोठे असल्याची शक्यता पोलिसांकडुन अधिक तपास सुरू
पुणे ते दुबई विमानसेवा आज आणि उद्या बंदपुणे ते दुबई विमानसेवा आज आणि उद्या बंद
पुण्यातून दुबईला जाणारे दोन विमान रद्द
तसेच दुबई वरून पुण्याला येणारे विमाने दोन दिवस रद्द
पुणे दुबई, तसेच दुबई पुणे या विमानसेवा देणाऱ्या दोन कंपन्यांचे विमान सेवा बंद
दुबई मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर तेथील विमानतळ बंद
मुंबईहून कोकणात जाणारी तेजस एक्सप्रेस ७ तासाने उशिराने मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर शहरात वाहतूक कोंडी० रायगड मध्ये मोठी वाहतूक कोंडी
० मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर शहरात वाहतूक कोंडी
० शिमगोत्सवासाठी गावी निघालेल्या मुंबईकर कोकणवासीया रायगडच्या माणगाव आणि इंदापुरमध्ये वाहतुक कोंडीत आडकले
० शिगगोत्सवासाठी मुंबईकरांचा कोकणाच्या दिशेने प्रवास सुरु
० माणगाव आणि इंदापूर शहराजवळ 4 ते 5 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा
० शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर कोकणात निघाल्याने झाली आहे वाहतूक कोंडी
० माणगाव पुणे महामार्गावर देखील वाहतूक कोंडी
सांगलीत रंगला भारत विरुद्ध इराण कुस्ती सामनासांगलीमध्ये रंगलेल्या भारत विरुद्ध इराण कुस्ती स्पर्धेत इराणच्या मल्लाने बाजी मारत छत्रपती केसरी किताब पटकावला आहे.सांगलीतल्या कुस्तीप्रेमी ग्रुप तर्फे भव्य कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आलं होतं,ज्यामध्ये भारत केसरी शेरा गुज्जर विरुद्ध मिर्झा इराण यांच्यात प्रमुख कुस्ती पार पडली,सुमारे अर्धा तास रंगलेल्या कुस्तीमध्ये मिर्झा इराण याने शेरा गुजर वर कब्जा घेत गुणावर छत्रपती केसरी किताब पटकावला. डबल महाराष्ट्र केसरीच्या चंद्रहार पाटील यांच्या हस्ते किताब देण्यात आला.तर महिला गटात प्रतीक्षा बागडी विरुद्ध सोनाली मंडलिक यांच्यात लढत झाली,मात्र कुस्ती बरोबरीत सुटल्याने टॉस सोनालीला विजय मिळवत राजमाता जिजाऊ केसरी किताब पटकावला.सांगलीच्या कृष्णा नदीवरील सरकारी घाटावर कुस्त्यांचा आयोजन करण्यात आलं होतं,या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठे गर्दी केली होती.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिक्षण मंडळाच्या बैठकीला उपस्थितउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिक्षण मंडळाच्या बैठकीला उपस्थित
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शिक्षण मंडळाच्या बैठकीला उपस्थित
शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी अजित पवार होते, त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदा शिक्षण मंडळाच्या कार्यालयात
राज्यात ४२ हजार हेक्टरवरील पिकांना ‘अवकाळी’चा फटका'बीड, लातूर जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान
फेब्रुवारी महिन्यात २२ व २३ तारखेला झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे तब्बल ४२ हजार २१० हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे मोठे नुकसान
हरभरा, गहू, ज्वारी, कापूस, मका, तीळ तसेच द्राक्षे, आंबा, कलिंगड, खरबूज, संत्रा, केळी, पपई व भाजीपाल्याला फटका
बीड जिल्ह्यात २१ हजार ४२५ तर लातूर जिल्ह्यात १५ हजार ५१६ हेक्टर क्षेत्र बाधित
पंचनामे सुरू असून नुकसान क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
Ratnagiri: रत्नागिरीत आता RTO कडे एमटीटीईएस वाहनराष्ट्रीय महामार्गांवर्ती नियम मोडणाऱ्या विरोधात होणारी कारवाई आता अधिक जलद आणि पारदर्शीपणे होणार आहे. याचं कारण म्हणजे एमटीईएस ही यंत्रणा रत्नागिरी जिल्ह्यातील आरटीओ विभागाकडे दाखल झाली आहे. रडारला कनेक्ट असणारी ही यंत्रणा वापरल्यामुळे वाहन चालवताना नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे. सध्या कार्यरत असणाऱ्या स्पीड गन पेक्षा देखील अधिक वेगाने ही यंत्रणा काम करेल. त्यामुळे अधिक स्पीड, सीट बेल्ट नसणे, हेल्मेट न घालणारा दुचाकी स्वार यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. रात्रीच्या वेळी देखील हि यंत्रणा अधिक पारदर्शकपणे काम करू शकणार आहे.
पुण्यातील ८० विद्यार्थी अन् ४ शिक्षक दुबईत अडकलेपुण्यातील नामांकित विद्यालयाचे ८४ जणं दुबई मध्ये अडकले
८४ जणांमध्ये ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षकांचा समावेश
पुण्यातील नामांकित विद्यालयाचे सर्व विद्यार्थी सुरक्षित
परराष्ट्र मंत्रालयाकडून पुण्यातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू
पुण्यातील नामांकित विद्यालयाचे विद्यार्थी "स्टडी व्हिसिट" साठी दुबई येथे गेले होते
कृपया कोणी ही घाबरून जाऊ नये, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशात आणले जाणार, महाविद्यालयाचे आवाहन
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सुद्धा विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू
Bhandara: भंडाऱ्यात पार्किंगमध्ये उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून एकाचा मृत्यू....भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या राईस मिल आवारातील ट्रॅकवर आदळली. या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. योगेश बरैया (४४) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ही घटना भंडाऱ्याच्या लाखनी - पालांदूर मार्गावरील पेंढरी इथं घडली. मृतक हा त्याच्या दुचाकीच्या पेट्रोल टँकवर गव्हाचं पोतं ठेवून वाहतूक करीत असल्यानं दुचाकीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Maval: मावळच्या विकासाला नवे बळ! जांभूळ येथे पाच कोटींच्या तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन...मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जांभूळ (ता. मावळ) येथे सुमारे ५ कोटी रुपयांच्या भव्य ‘तालुका क्रीडा संकुला’चे भूमिपूजन त्यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा व दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या दूरदृष्टीतून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज घेणार माळेगाव कारखान्याची चेअरमन पदाची जबाबदारीउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज घेणार माळेगाव कारखान्याची चेअरमन पदाची जबाबदारी.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांची माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदाची रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार यांची निवड केली जाणार?
आज या संदर्भात माळेगाव कारखाना सभागृहात सदरची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.
नागपूरच्या SBL कंपनीत भीषण स्फोट; १५ जण जखमीकाटोल तालुक्यातील राऊळगाव येथील बारुद कंपनीत स्फोट १५ जखमींना नागपूरला हलविले. मोठ्या प्रमाणात स्फोट नंतर आग बचावकार्य सुरु.....
SBL कंपनीत सकाळी 7 वाजताच सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती...
धाराशिव जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा शिवसेना-भाजप मधील पेच सुटणार?भाजप सोबत सहलीवर गेलेले शिवसेनेचे दोन सदस्य घेऊन भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटलांधी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
पालकमंत्री प्रताप सरनाईक,शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवींची ही भेटीवेळी उपस्थिती
तसेच बंडखोरी करत अपक्ष निवडून आलेले आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी दरम्यान उपस्थित
भेटीवेळी धाराशिव मधील शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुलेही हजर
शिवसेनेतील तानाजी सावंत गटाकडून दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या गोठात असल्याबद्दल नोंदवला होता आक्षेप,त्या दोन्ही सदस्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
धाराशिव मधील पंचायत समितीच्या सभापती निवड अगोदर होणार, त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष बाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती
जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 6 मार्चला पंचायत समिती सभापती निवड, तर 13 मार्च जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी बैठक
सत्ता स्थापनेत शिवसेना आमदार तानाजी सावंत यांची भूमिका काय असणार याकडे लागले लक्ष
चंद्र ग्रहणाच्या पाश्र्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेत बदलमहाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.चंद्र ग्रहणाच्या पाश्र्वभूमीवर 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 6.44 ते 6.48 या ग्रहण कालावधीत तुळजाभवानी मातेला शुभ्र श्वेत वस्ञामध्ये सोवळ्यात ठेवण्यात येईल.ग्रहण कालावधीत सायंकाळ चा तुळजाभवानी मातेचा नित्योपचार धार्मिक पुजा विधिवत बदल करण्यात आला असुन तसेच ग्रहण सुटल्यानंतर सायंकाळी 6.55 वा नित्यपुजेची घाट होऊन सायंकाळ चे सिंहासन पुजा,अभिषेक पुजेला प्रारंभ होणार आहे.राञी 9 वाजता अभिषेक पुजेनंतर देवीस महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन धुपारती होईल.
Purandar: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाला वेग१५ मार्चपर्यंत पॅकेजवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला येत्या १५ दिवसांत गती मिळण्याची शक्यता
मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात पॅकेजला अंतिम मंजुरी देऊन निधी वाटप सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे
सुमारे तीन हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे
शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी सहा हजार कोटी रुपये कर्जस्वरूपात उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे
बाधितांना एरोसिटीमध्येच परताव्याची जागा देण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे
Parth Pawar: पार्थ व जय पवार यांच्याकडून बारामतीतील विकासकामांची पहाटे पाहणीदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी भल्या पहाटेच कामाला सुरुवात करत होते हाच वारसा पुढे नेला आहे त्यांचे दोन्ही मुलं जय आणि पार्थ यांनी. आज पहाटे पार्थ पवार व जय पवार यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी बारामती क्रीडा संकुलासह शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना भेट देत कामांची प्रगती तपासली.
Dubai: दुबईला जाणारे चार विमाने रद्दइराण-इजराइल अमेरिका युद्धामुळे पुण्यातून अबू धाबी दुबईला जाणारे चार विमाने रद्द
पुण्यातून स्पाइस जेट कंपनीचे मुंबई ते दुबई तसेच एअर इंडिया एक्सप्रेस चे पुणे ते आबा धाबी विमान रद्द
विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात
विमानतळावर येण्याआधी प्रवाशांनी संबंधित एअरलाइनशी संपर्क साधून फ्लईट स्टेटस तपासण्याची विमानतळ प्रशासनाची विनंती
युद्धजन्य परिस्थिती संपल्यानंतर पुढील तारखेचे पर्यायी उड्डाण प्रवाशांना दिले जातील
Jalna: जालन्यातील बदनापूर येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडकजालन्यातील बदनापूर येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात झालाय. या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघेजण जखमी झाले आहे.जालन्यातील बदनापूर येथून जालन्याकडे येणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघेजण जखमी झाले आहेत. जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या बदनापूर शहरात काल रात्री हा अपघात झालाय. कपूरचंद गुसिंगे असं या घटनेत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काल रात्री अपघात झाल्यानंतर या महामार्गावर वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती.
यवतमाळमध्ये शेतशिवारात हळद काढणीला वेगयवतमाळच्या पुसद तालुक्यात सध्या हळद काढणीच्या कामाला जोरदार वेग आल्याचे चित्र शेतशिवारात पाहायला मिळत असून मजुराद्वारे हळद काढणीची लगबग सुरू आहे.मोठा कोचा व शेंग अशी तीन प्रकारची प्रतवारी करून ढीग जमा केली जात आहे.
Jaljeevan: जलजीवनची कामे ठप्प,128 कोटींची देखे थकलीजल जीवन मिशनचा निधी तुकड्या तुकड्यात वितरित केली जाताहेत आज घडीच तब्बल 128 कोटीची देखके थकीत आहे पाणीपुरवठा विभागाने निधीची मागणी केली प्रलंबित देखकांभावी कंत्राटदारांनी संपूर्ण कामे ठप्प पाडली आहे सध्या स्थितीत यवतमाळ जिल्ह्यात 60 टक्क्याहून अधिक कामे पूर्णत्वास आली आहेत जलजीवन मिशनच्या कामांना मार्च 2024 पासून चांगलीच घरघर लागली आहे.
Yavatmal: पोलीस भरतीची मैदान चाचणी संपलीयवतमाळ जिल्हा पोलीस दलात शिपाई पदासाठीच्या 150 जागांसाठी 26 फेब्रुवारी पर्यंत मैदानी चाचणी घेण्यात आली ऑनलाईन द्वारे तेरा हजार 780 जणांनी अर्ज केले होते प्रत्यक्ष चाचणीसाठी दहा हजार त्रेचाळीस उमेदवार मैदानात उतरले सर्वप्रथम छाती व उंचीचे मोजमाप करण्यात आले यामध्ये 861 जण अपात्र ठरले त्यानंतरच्या मैदानी चाचणीत 5 हजार 253 जणांनी मैदान मारले आता कटऑफ लागल्यानंतर लेखी परीक्षेसाठ लेखी परीक्षेसाठी 1 हजार 500 जणांची निवड होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Satara: आंधळीत बैलगाडा शर्यतीचा थरार-सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आंधळी येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य बैलगाडा शर्यती पार पडल्या. राज्यात प्रथमच ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सरपंच दादासाहेब काळे यांनी हा उपक्रम राबवला.
आंधळी-टाकेवाडी रोडवरील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत बादल आणि बलमा या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडा मालकांसह 500 हून अधिक बैलजोड्या या बैलगाडा शर्यतीत सहभागी झाल्या.थरारक शर्यती पाहण्यासाठी हजारो शौकिनांनी गर्दी केली होती. यावेळी विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक आणि ढाल देऊन गौरवण्यात आले.
खारघरमध्ये ‘हिंद की चादर’ कार्यक्रमात बॅनर कोसळला; महिलेला किरकोळ दुखापतनवी मुंबई येथील खारघर परिसरात सुरू असलेल्या ‘हिंद की चादर’ कार्यक्रमादरम्यान मैदानाजवळ लावलेला एक पोस्टर अचानक कोसळला. या घटनेत तेथे उभी असलेली एक महिला बॅनरखाली अडकली.
घटनेनंतर कार्यक्रमस्थळी तैनात सुरक्षारक्षकांनी तात्काळ मदत व बचावकार्य सुरू केले. त्यांनी बॅनर बाजूला करून महिलेला सुरक्षित बाहेर काढले. महिलेला किरकोळ दुखापत झाली असून तिला घटनास्थळीच प्राथमिक उपचार देण्यात आले.
काही वेळातच रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाली; मात्र बॅनर हलका असल्याने गंभीर इजा झाली नाही आणि महिलेला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही.
मावळातील आढले गावात स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज्यातील पहिला अर्धकृती पुतळा उभारला...मावळ तालुक्यातील आढले येथील गुरुकुल विद्यालय परिसरात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा राज्यातील पहिला अर्धकृती पुतळा उभारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी तसेच अजितदादांचे विकासाभिमुख विचार, स्वच्छतेबाबतचा संदेश आणि समाजहिताची भूमिका कायम विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहावी या उद्देशाने गुरुकुल संस्थेचे विश्वस्त सचिन घोटकुले यांनी हा अर्धकृती पुतळा उभारण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांनी राज्यातील पायाभूत सुविधा विकास, जलसंधारण प्रकल्प, ग्रामीण भागाचा विकास, शिक्षण क्षेत्राला दिलेले योगदान तसेच शेतकरी हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख दृष्टीकोन ठेवून जबाबदार नागरिक म्हणून घडावे आणि लोकसेवा, विकास व पारदर्शक प्रशासनाची प्रेरणा या पुतळ्याच्या माध्यमातून सातत्याने मिळत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला माजी मंत्री बाळा भेगडे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती