Mumbai Crime News : मुंबईतील बोरीवली पश्चिम येथील आय.सी. कॉलनी परिसरात असलेल्या माय गोल्ड पॉईंट या ज्वेलरी दुकानातून तब्बल 6 कोटी 79 लाख 85 हजार रुपये किमतीचे सोने, चांदी व डायमंडचे दागिने चोरीस गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलीसांनी सलग 45 दिवस केला. या तपासानंतर राजस्थान येथून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बोरीवलीतील ज्वेलरी दुकान फोडीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 6.79 कोटींच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या प्रकरणी 4 आरोंपीना राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. या चोरीप्रकरणी दुकानमालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, ज्वेलरी दुकानातील तिजोरीत ठेवलेले दागिने अज्ञात इसमांनी लबाडीच्या उद्देशाने चोरून नेले होते. प्राथमिक तपासात दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधित गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे आरोपी राजस्थानमध्ये पळून गेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस पथकांनी राजस्थानमधील विविध भागात शोधमोहीम राबवली. जंगल परिसरात लपून बसलेल्या आरोपींना शोधण्यासाठी संयुक्त कारवाई करण्यात आली असून ड्रोन व तांत्रिक साधनांचा वापर करण्यात आला.
या कारवाईदरम्यान एकामागोमाग एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. अटक केलेल्या आरोपींकडून आतापर्यंत अंदाजे 3 किलो सोन्याचे दागिने (किंमत सुमारे 4.50 कोटी रुपये) आणि 5 किलो चांदीचे दागिने (किंमत सुमारे 15 लाख रुपये)असा एकूण 4.65 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उर्वरित चोरीचा माल जप्त करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या ज्वेलरी चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, पुढील तपासाद्वारे या गुन्ह्याशी संबंधित इतर बाबींचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुकानमालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, ज्वेलरी दुकानातील तिजोरीत ठेवलेले दागिने अज्ञात इसमांनी लबाडीच्या उद्देशाने चोरून नेले होते. प्राथमिक तपासात दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधित गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू करण्यात आला. तब्बल 45 दिवस या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु होता. अखेर या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी राजस्थानमधून आरोपींना अटक केली आहे.