Marathi Actress Bhakti Ratnaparkhi Mother Passes Away: मराठी टेलिव्हिजन विश्वातील (Marathi Television World) लोकप्रिय मराठी अभिनेत्रीवर (Marathi Actress) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री भक्ती रत्नपारखीला (Bhakti Ratnaparkhi) मातृशोक झालाय. अभिनेत्रीनं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करुन आईच्या निधनाची दुःखद बातमी सांगितली आहे. भक्तीच्या पोस्टवर कमेंट करुन तिच्या सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी तिच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.
मराठी अभिनेत्री भक्ती रत्नपारखीच्या आईचं 22 फेब्रुवारी 2026 रोजी निधन झालं. भक्तीनं स्वतः आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या भावना व्यक्त केल्या आहे. पोस्टमध्ये भक्ती म्हणाली आहे की, "आई तू माझ्यासोबतच आहेस. तुझा हसरा चेहराच सगळ्यांच्या लक्षात राहील. 22 फेब्रुवारी 2026 ला आईला देवाज्ञा झाली. तिचं आवडीचं स्वयंपाकाचं काम करत असताना घरी आलेल्या पाहुण्यांच स्वागत करुन हसत-हसत कोणाला कसलाही त्रास न देता अचानक गेली..."
सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये पुढे बोलताना भक्ती रत्नपारखी म्हणाली की, "अजूनही मला खरं वाटत नाहीय. माझे आई-बाबा दोघेही असेच अचानक गेले. खुप वाईट वाटत आहे. पण ते दोघंही माझ्याबरोबर आहेत..."
दरम्यान, भक्तीनं शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट करुन अनेकांनी अभिनेत्रीचं सांत्वन केलं आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी अभिनेत्रीला धीर दिला आहे. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं भक्तीच्या पोस्टवर सॅड इमोजी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर, अभिनेत्री माधवी निमकरनं "काकुंना भावपूर्ण श्रद्धांजली...", अशी कमेंट केली आहे. त्यासोबतच अभिनेता कपिल होनराव यानं "ॐ शांती..." अशी कमेंट केली आहे. तसेच, अद्वैत दादरकरनं "काळजी घे" असं म्हणत भक्तीचं सांत्वन केलं आहे. तसेच, भक्तीच्या चाहत्यांनीसुद्धा या पोस्टखालील कमेंट्समध्ये तिच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.
भक्ती रत्नपारखीच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर, अभिनेत्रीनं आजवर अनेक नाटकं, सिनेमे आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'अगंबाई सासुबाई, अगंबाई सुनबाई', 'तू भेटशी नव्यानं', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' अशा लोकप्रिय मालिका आणि सिनेमांमधून भक्ती घराघरांत पोहोचली.