Latest Marathi News Live Update : इस्त्राईलला धोक्याची घंटा
esakal March 03, 2026 11:45 AM
इस्त्राईलला धोक्याची घंटा

इस्त्राईलला धोक्याची घंटा

इराणने थेट इस्रायलच्या दिशेनेही अनेक क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामुळे संपूर्ण इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र सायरन वाजत आहेत.

नागरिकांना तातडीने बंकर्स आणि सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इस्रायलची 'आयरन डोम' आणि 'आयरन बीम' ही संरक्षण यंत्रणा या हल्ल्यांना रोखण्यासाठी सक्रिय करण्यात आली आहे.

आखाती देशात रात्रभर युद्धाचे सावट, ३ भारतीयांचा मृत्यू

आखाती देशात रात्रभर युद्धाचे सावट, ३ भारतीयांचा मृत्यू

आखाती देशात युद्धाचे सावट आणखी गडद झाले असून ३ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहितीसमोर आली आहे. आखातात रात्रभरात काय घडले? इराणने कुवेत, कतर, इस्रायलसह बहरीनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला; इस्रायलचा तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालयावर हल्ला, इराण-इस्रायल युद्धात आता कुवेत, कतार आणि बहरीन ओढले गेले आहेत. इराणने डागलेली ७० हून अधिक क्षेपणास्त्रे बहरीनने पाडली. इस्रायलचा तेहरानमधील सरकारी टीव्हीवर मोठा एअर स्ट्राईक करण्यात आल्याने युद्ध आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.