Axar Patel Pulls Sanju Samson’s Leg: भारतीय संघ टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहचला आहे. त्यामुळे सध्या भारतीय संघात आनंदाचे वातावरण आहे. याचाच प्रत्येय नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून आला आहे, ज्यात अक्षर पटेल संजू सॅमसनची मस्करी करताना दिसत आहे.
T20 World Cup मधून बाहेर होऊनही वेस्ट इंडिज-झिम्बाब्वेचे खेळाडू भारतातच अडकले, जाणून घ्या कारणखरंतर भारतीय संघ (Team India) या स्पर्धेतून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर होता, मात्र रविवारी कोलकाताला वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या करो वा मरोच्या सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवला आणि उपांत्य फेरीतील स्थान पक्के करत स्पर्धेतील आव्हान कायम केले. भारताच्या या विजयात संजू सॅमसनने (Sanju Samson) मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात भारतासमोर विजयासाठी १९६ धावांचे लक्ष्य होते. यापूर्वी एवढे मोठे लक्ष्य भारताने पार केले नव्हते. पण यावेळी सॅमसन एका बाजूने खंबीरपणे उभा राहिला. त्याने सोबत फलंदाजीला येणाऱ्या खेळाडूंसोबत छोट्या छोट्या भागीदाऱ्या करत संघाला विजयापर्यंत पोहचवले.
त्याने ५० चेंडूत नाबाद ९७ धावांची खेळी केली. त्याने विजयी चौकार मारत २० व्या षटकात भारताला १९९ धावांपर्यंत पोहचवत विजय निश्चित केला. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी ठरली.
दरम्यान, सॅमसन सुरुवातीला प्लेइंग इलेव्हनमधील जागेसाठी भारतीय संघव्यवस्थापनाची पहिली पसंती नव्हता. मात्र वरच्या फळीतील फलंदाजांचे अपयश पाहाता, त्याला नंतर संधी देण्यात आली. त्यानेही ही संधी साधली आणि भारताचा उपांत्य फेरीत पोहचवले. खरंतर सॅमसनने २०१५ मध्येच भारतीय संघासाठी पदार्पण केले होते.
मात्र तो सातत्याने भारतीय संघात आत-बाहेर होत राहिला आहे. तसेच या टी२० वर्ल्ड कपपूर्वीही (T20 World Cup) तो फारशा चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. पण त्याने आता ९७ धावांची खेळी करत त्याची क्षमता दाखवून दिली.
Sanju Samson: संजू सॅमसनवर एका सामन्याची बंदी, IND vs ENG उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार, ICC ची कारवाई? जाणून घ्या नेमकं सत्ययानंतर कोलकाताहून मुंबईला येतानाच्या प्रवासात अक्षर पटेलने (Axar Patel) संजू सॅमसनची मस्करी केली होती, याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. यात दिसते की संजू सॅमसन त्याच्या सीटवर बसला आहे, तर त्याच्याजवळच अक्षर उभा आहे. अक्षर सॅमसनला विचारतो की 'वेल डन यार. थोडं सांग किती चांगलं वाटत आहे? कसं वाटत आहे? आपण संकटांशी तर खेळतोच.'
त्यावेळी संजू अक्षरला सांगतो, तुझ्या मागे उभा आहे, हे ऐकून अक्षर त्याला म्हणतो कोण आहे माझ्या मागे, त्यावेळी तिथे कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) उभा असल्याचे दिसतो. सूर्यकुमारही हसून सांगतो की मी उभा आहे.
त्यानंतर अक्षर सॅमसनची मस्करी करताना म्हणतो, 'चेट्टा, तुझं पदार्पण कधी झालं होतं?' ते ऐकून मात्र सॅमसनला हसू आवरत नाही.
संजू सॅमसनने त्याच्या कारकिर्दीत १६ वनडे आणि ६० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने वनडेत एक शतक आणि ३ अर्धशतकांसह ५१० धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ३ शतके आणि ४ अर्धशतकांसह १२२१ धावा केल्या आहेत.