'टीसी'च्या दोन विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीची संधी
esakal March 03, 2026 05:45 PM

बारामती, ता. ३ : येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या फूड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमातील दोन विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. ऋचा ऋषिकेश सातपुते हिची इंग्लंड येथील ‘टक्स अँड केकस’ बेटावर, तर आदित्य हेमंत काळे याची कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील मर्चंट नेव्हीतील ‘व्हिक्टरी बे’ या जहाजावर निवड झाली आहे.
दोन्ही विद्यार्थी मध्यमवर्गीय कुटुंबातील असून, त्यांनी जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर शिक्षण पूर्ण करत ही यशस्वी झेप घेतली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर संधी मिळवत महाविद्यालयाचा लौकिक उंचावला आहे.
फूड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमातील आतापर्यंत १० विद्यार्थी विविध देशांत शिक्षण व नोकरीसाठी गेले आहेत. या यशाबद्दल अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, रजिस्ट्रार अभिनंदन शहा, विषय शिक्षक जयमाला पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.