विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video
esakal March 04, 2026 03:45 AM

VICKY KAUSHAL TOUCHES FEET: बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता विकी कौशल हा नेहमीच त्यांच्या साधेपणामुळे ओळखला जातो. त्याने छावा सिनेमात साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली. सिनेमातील भूमिकेसाठी त्याचं आज देखील चाहत्यांकडून कौतूक होताना पहायला मिळतय. दरम्यान अशातच एका पुरस्कार सोहळ्यात विकीसमोर एका चिमुकलीनं 'छावा' सिनेमातील काही डायलॉग म्हणून दाखवले. ते ऐकताच विकी भारावून जात त्या चिमुकलीच्या पाया पडला.

विकी कौशल झी पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाला होता. यावेळी एक चिमुकली नववार नेसून स्टेजवर आली. त्या चिमुकलीनं छावा सिनेमातील काही संवाद तिच्या निरागस अंदाजात म्हणून दाखवले. 'हम शोर नही करते, सिधा शिकार करते है, जय भवानी' असं ती म्हणाली. तिचं गोड बोलणं पाहून विकीसह उपस्थित लोक सुद्धा भारावून गेले.

विकीनं सुद्धा नंतर चिमुकलीचं कौतूक केलं. तिचा परफॉर्मन्स झाल्यानंतर तो थेट तिच्या पाया पडला. विकीला असं करताना पाहून सगळेच थक्क झाले. यावेळी विकीनं त्या चिमुकलीला विचारलं की, 'प्रिशा मै आपको हग कर सकता हू. आपमे ते छावा से भी पॉवर था, क्या खा के आये हो' हे विचारताच चिमुकलीनं गोंडसपणे भात खाऊन आल्याचं सांगितलं. तिचं उत्तर ऐकताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.

View this post on Instagram

A post shared by Mamaraazzi (@mamaraazzi)