सिन्नर: समृद्धी महामार्गावर कोनांबे शिवारात सोमवारी (ता. २) पहाटे तीनला प्रवाशांची लूट करण्यात आली. कारच्या काचा फोडून चाकू, चॉपरसारख्या हत्यारांचा धाक दाखवून ही लूट झाली. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
उल्हासनगर येथील दीपा रमेश वाधवा (वय २७), अंजू दाणी, सिया दाणी यांच्यासह व एक व्यक्ती छत्रपती संभाजीनगर येथे जात होते. कोनांबे शिवारातील घाटाजवळ कार थांबविण्यात आली. या वेळी रस्त्यालगतच्या पुलाजवळील डोंगराजवळून तीन ते चार संशयित समृद्धी महामार्गावर आले.
तोंडाला रुमाल बांधलेल्या या संशयितांनी लाठ्या-काठ्यांनी कारच्या काचा फोडल्या. चाकू व चॉपरचा धाक दाखवून दीपा वाधवा यांच्याकडील २० हजार हजार रुपये रोख, सोन्याची अंगठी, कानातील टॉप, नथ, चांदीची अंगठी काढून घेतली.
Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाईअंजू दाणी यांच्या अंगावरील साडेतीन ग्रॅमची अंगठी, दोन ग्रॅमचे कानातील टॉप, अर्धा ग्रॅमची नथ, चांदीची अंगठी, पैंजण, सिया दाणी यांच्याकडील कानातील टॉप, नथ काढून घेतली. बॅगांचीही झडती घेतली. घटनेनंतर त्यांनी पोलिस ठाण्यामध्ये येत लुटीबाबत पोलिसांना माहिती दिली.
उपविभागीय अधिकारी के. के. पाटील, पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, उपनिरीक्षक दादासाहेब गाढवे, उपनिरीक्षक अंकुश वारुंगसे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी लूट करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथक नेमले आहे.