Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी संतापल्या! केवायसी करूनही मिळेनात पैसे; पात्र-अपात्रतेबाबत गोंधळ, लाभार्थी महिलांचे बँकांत हेलपाटे..
esakal March 04, 2026 10:46 PM

मंगळवेढा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा मिळणारे दीड हजार रुपये अनेक महिलांनी ई-केवायसी करूनही त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नाहीत. आपण योजनेसाठी पात्र आहोत की अपात्र, याची स्पष्ट माहिती न मिळाल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Success Story: ‘ती’च्या स्वप्नांना मिळतेय सासर-माहेरचं बळ; जिद्द अन् चिकाटीने ‘सहाय्यक संचालक’ पदाला गवसणी, सायली कांबळे-चव्हाण यांची भरारी!

यासंदर्भात तालुका स्तरावरील कार्यालयाशी संपर्क साधला असता सविस्तर माहिती कोणत्याही अधिकाऱ्याकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यामुळे अनुदान न मिळालेल्या महिला संभ्रमात असून वारंवार बँकेत जाऊन हेलपाटे घालत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणुकीपूर्वी काही महिलांच्या खात्यावर रक्कम जमा झाली होती. मात्र डिसेंबरपूर्वी शासनाने पात्र महिलांना पुन्हा ई-केवायसी करण्याची अट घातली. महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली; तरीही त्यानंतर अनेकांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही.

शासनाकडून दरमहा हप्ता जमा केल्याचे जाहीर केले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक महिलांना लाभ मिळालेला नाही. योजनेच्या संकेतस्थळावर चुकीची ई-केवायसी दुरुस्त करण्याचा पर्याय उपलब्ध आहे; मात्र केवायसी पूर्ण झाली आहे की नाही, याची स्पष्ट माहिती उपलब्ध होत नसल्याची तक्रार लाभार्थींनी केली आहे.योजनेतील लाभार्थींबाबात सुरवातीपासूनच स्पष्टता नसल्याने लाभार्थींना पैसे मिळत नाहीत.

तालुक्यातील लाभार्थींवर एक नजर

लाडकी बहीण योजनेसाठी ३५ हजार ७१८ महिलांनी अर्ज केले.

त्यापैकी ४,७२२ महिलांच्या लाभाबाबत शासनाने पडताळणी सुरू केली आहे.

७९७ महिलांनी ६५ वर्षे पूर्ण केल्याने त्यांचा लाभ बंद झाला.

२०३ महिलांनी वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी ऑनलाइन अर्ज केले.

६४ अर्जांमध्ये महिलेऐवजी पुरुषांची नोंद आढळल्याने अनुदान प्रलंबित आहे.

योजनेच्या नावाने महिलांना बोंबाबोंब करण्याची वेळ आली आहे. पात्र-अपात्रतेबाबत स्पष्ट माहिती तालुकास्तरावर उपलब्ध व्हावी. विनाकारण महिलांना हेलपाटे घालायला लावणे व त्रास देणे शासनाने थांबवावे.

- ॲड. कोमल साळुंखे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)

Shaktipith Highway: शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी सुरू; कलम १६३ लागू, गावांमध्ये तणाव, शेतकऱ्यांचा संवादाचा आग्रह!

योजनेसाठी शासनाने घालून दिलेल्या अटींनुसार मी पात्र असून ई-केवायसीही केली आहे. मात्र तीन महिने उलटूनही अनुदान खात्यावर जमा झालेले नाही.

- अश्विनी सोलनकर, लाभार्थी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.