टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात आमनेसामने असणार आहेत. टीम इंडियाने या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा अपवाद वगळता इतर सर्व सामन्यात जबरदस्त कामगिरी करुन आपण गतविजेचा का आहोत हे दाखवून दिलं. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 साली टी 20I वर्ल्ड कप जिंकला होता. आता टीम इंडिया सलग दुसरा वर्ल्ड कप जिंकण्यापासून 2 पाऊलं दूर आहे. टीम इंडियाने साखळीनंतर सुपर 8 फेरीत जबरदस्त अशी कामगिरी करुन दाखवली. त्यानंतर आता गुरुवारी टीम इंडिया फायलनचं तिकीट मिळवण्यासाठी इंग्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल याने प्लेइंग ईलेव्हनबाबत अपडेट दिली आहे. तसेच अभिषेक शर्मा याच्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.