आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आहे. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर मात करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर यजमान आणि गतविजेत्या टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत 8 मार्चला न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. अंतिम सामन्यात टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा पोहचणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे. अशात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
निवड समितीने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केल आहे. शेजारी पाकिस्तान क्रिकेट टीमचं टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतून आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तान श्रीलंकेविरुद्ध सुपर 8 फेरीत सेमी फायनलच्या हिशोबाने नेट रनरेटनुसार विजय मिळवण्यात अपयशी ठरली. त्यामुळे पाकिस्तान विजयानंतरही सेमी फायनलमध्ये पोहचण्यात अपयशी ठरली. आता पाकिस्तान वर्ल्ड कप मोहिमेनंतर बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
पाकिस्तान बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तान या दौऱ्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेटने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉमद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
बांगलादेश विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी पाकिस्तान टीम : शाहीन शाह अफ्रिदी (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अशरफ, फैसल अकरम, हारिस रऊफ, हुसैन तलत, माज सदाकत, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, मुहम्मद गाजी गोरी (विकेटकीपर), साद मसूद, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा आणि शमील हुसैन.