सतीश ढेकळे यांचे निधन
esakal March 05, 2026 05:45 PM

NPT26B08797
सतीश ढेकळे
............
नातेपुते : येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश ढेकळे (वय ४४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.
माळशिरस तालुक्यात गावोगावी त्यांनी स्वखर्चाने रस्ते आणि पाण्याच्या समस्या सोडवल्या होत्या. याशिवाय आरोग्य शिबिरे, मोफत बोअरवेल आणि शालेय साहित्याचे वाटप यांसारखे उपक्रमही राबवले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार रामहरी रुपनवर, राम सातपुते, जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, शरद मोरे, मामासाहेब पांढरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.