मदर क्विन्स स्कूलचे जेट टॉईज स्पर्धेत यश
esakal March 06, 2026 12:45 AM

swt511.jpg
28760
सावंतवाडी ः जेट टॉईज स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसोबत मान्यवर.

मदर क्विन्स स्कूलचे
जेट टॉईज स्पर्धेत यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील मदर क्विन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जेट टॉईज स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादित केले. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, मुंबई द्वारे आयोजित लोकल ऑलिंपिक जेट टॉईज स्पर्धा वसुंधरा विज्ञान केंद्र, कुडाळ येथे झाली. या स्पर्धेत श्लोक सावंत, रिया जेवरे, अझिमन करोल, आराध्य गावडे या सहावीच्या विद्यार्थ्यांच्या संघाने सांघिक कौशल्याच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व पदके देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावत भोसले, शुभदादेवी भोसले, लखमराजे भोसले, श्रद्धाराजे भोसले, दिलीप देसाई, शामराव सावंत, जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.