इंधन टंचाईच्या अफवेमुळे धावाधाव
कासा, चारोटीतील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा
कासा, ता. ५ (बातमीदार) ः मध्यपूर्वेतील अमेरिका- इस्राईल- इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाची कमतरता निर्माण होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संभाव्य टंचाईच्या भीतीने पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी कासा, चारोटी परिसरातील पंपांवर गुरुवारी (ता. ५) सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर इंधन तुटवडा निर्माण होणार असल्याचे संदेश व्हायरल होत आहेत. परिणामी, वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत; पण इंधन टंचाईबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याने अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन कासा पोलिस ठाण्याचे अधिकारी अमर पाटील यांनी केले आहे.