उन्हाळा सुरू झाला आहे. नागरिकांसाठी पिंपरी चिंचवड शहर परिसरातील सर्व उद्याने रात्री साडेदहा, अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावीत. कारण, शहरात बराच कामगार वर्ग आहे. ते कामावरून साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत येतात. जेवण झाल्यानंतर त्यांना बाहेर फेरफटका मारण्यासाठी काही जागा नाही आणि सध्याची उद्यानाची वेळ काही ठिकाणी आठ, तर काही ठिकाणी नऊ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी उद्यानाची वेळ वाढवून देण्यात यावी.
- एक वाचक