'मला ती बाहुलीसारखी वाटायची...' अभिनेत्रीसोबतच्या रिलेशनशिपबद्दल स्पष्टच बोलला गोविंदा, म्हणाला... 'ती इतकी प्रेमळ की...'
esakal March 06, 2026 07:46 AM

GOVINDA RECALLS HIS ADMIRATION FOR ACTRESS: गोविंदा हा ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. एकापाठोपाठ एक सिनेमे त्याचे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायचे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून गोविंदा त्यांच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय. सुनिता अहुजाने त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

सुनीताने तिच्या व्लॉकमध्ये गोविंदाचं एका अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचं म्हटलंय. परंतु ९० च्या दशकात गोविंदा सुनीता नाहीतर एका वेगळ्याच अभिनेत्रीच्या प्रेमात होता. त्याकाळी त्याच्या अफेअरच्या अनेक बातम्या रंगल्या. दरम्यान आता एका मुलाखतीत बोलताना गोविंदाने त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितलय.

गोविंदाला अभिनेत्री नीलम कोठारी प्रचंड आवडायची. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत त्याला नीलमच्या प्रेमात होता का? असं विचारण्यात आलं. यावर तो म्हणाला की, 'आमच्यासारख्या गावातील तरुणांना सुंदर गोऱ्या मुली प्रचंड आवडतात. त्यात नीलम प्रचंड सुंदर आणि चांगली मुलगी होती. ती एखाद्या बाहुलीसारखी दिसायची. तिचे अनेक सिनेमे मी पहायचो. जेव्हा मला कळलं की, तिच्यासोबत सिनेमा करण्याची संधी मिळतेय, तेव्हा मला विश्वासच बसला नव्हता.'

दरम्यान मुलाखतीत गोविंदा दोघांचं रिलेशन होत की नाही याबद्दल स्पष्ट बोलला नाही. परंतु त्याने तिच्याबद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, 'आताच्या काळात सिनेसृष्टीत जसे अफेअर्स होतात, तसे पुर्वी नसायचे. आम्ही सेटवर खुप मजामस्ती करायचो. आम्हाला कळायचं की, आमच्यात काहीतरी होतय. त्या काळात पाहणं म्हणजेच रोमान्स होता. आम्ही एकत्र खुप छान काम केलं.'

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)