प्रिस्टीन प्रो लाईफमध्ये सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित
esakal March 06, 2026 07:46 AM

वाकड, ता. ५ : वाकडमधील प्रिस्टीन प्रोलाइफ फेज ३ सोसायटीतील १२० किलोवॅट क्षमतेचा रूफटॉप सौरउर्जा नुकताच कार्यान्वित करण्यात आला. त्यासाठी सोसायटीला २१.६७ लाख रुपयांचे सरकारी अनुदान मिळाले.
या प्रकल्पाचे उद्घाटन नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष अल्केश चरपे, सचिव स्वरूप पाटील, खजिनदार अरविंद, अनुराग शिरोडे, भिवाजी सूर्यवंशी, श्रीधर घरपुरे, प्रशांत गोरे, अनुराग तिवारी आदी उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी सुमारे ७६ लाख रुपये खर्च झाला. मात्र त्याद्वारे दर महिन्याला सोसायटीच्या सुमारे २ लाख ३० हजार इतक्या वीज बिलाची बचत होणार आहे. तसेच पर्यावरणपूरक व शाश्वत ऊर्जेच्या वापराला मोठी चालना मिळणार आहे, असे मत सोसायटीचे सचिव स्वरूप पाटील व अध्यक्ष अल्केश चरपे यांनी व्यक्त केले.

प्रिस्टीन प्रोलाइफ फेज ३ सोसायटीतील सदस्यांनी राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून सरकारची मदत आणि कालमर्यादा यासाठी हा प्रकल्प संपूर्ण शहरात ‘रोल मॉडेल‘ ठरेल. असे प्रकल्प इतर सोसायटीत राबवले गेले पाहिजेत.
- राहुल कलाटे, नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापालिका

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.