भारत 11 विरुद्ध न्यूझीलंड T20 विश्वचषक 2026 फायनल खेळत आहे: 2026 च्या टी-20 वर्ल्डकपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गुरुवारी (6 मार्च) भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची चिंता अजूनही संपलेली नाही. भारताला 8 मार्च रोजी अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळायचा आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना प्लेइंग इलेव्हनबाबत मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. भारताच्या चिंतेचे प्रमुख कारण म्हणजे जगातील नंबर-1 फलंदाज अभिषेक शर्मा आणि नंबर-1 गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांची खराब कामगिरी आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे भारत आणि इंग्लंडच्या फलंदाजांनी धडाकेबाज खेळ केला. मात्र अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ 7 चेंडूत 9 धावा केल्या. संपूर्ण स्पर्धेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली असून तो फक्त झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक झळकावू शकला आहे.
दुसरीकडे, फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 4 षटकांत तब्बल 64 धावा दिल्या. मागील काही सामन्यांपासून तोही संघर्ष करताना दिसत आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनाला अभिषेक आणि वरुण यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवायचा की प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करायचा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारतीय संघाकडे पर्याय उपलब्ध
भारतीय संघाकडे फलंदाजीसाठी रिंकू सिंग हा मजबूत पर्याय आहे. तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून वॉशिंग्टन सुंदर संघात येऊ शकतो. गोलंदाजी विभागात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि फिरकीपटू कुलदीप यादव हे पर्याय उपलब्ध आहेत. जर संघात बदल करण्याचा निर्णय झाला, तर अभिषेक शर्माच्या जागी रिंकू सिंगला संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत संजू सॅमसनसोबत इशान किशन डावाची सुरुवात करू शकतो.
अभिषेक आणि वरुणला लागले ग्रहण…
वरुण चक्रवर्तीच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. अंतिम सामन्यासारख्या मोठ्या लढतीत संघ सामान्यतः विजयी संघरचनेत बदल करणे टाळतात. मात्र अभिषेक आणि वरुण यांची सातत्याने होत असलेली निराशाजनक कामगिरी पाहता प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झाला किंवा नाही, तरीही कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग 11 (India Playing 11 Final VS New Zealand)
अभिषेक शर्मा/रिंकू सिंग, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
हे ही वाचा –
आणखी वाचा