भारतीयांच्या हृदयाचे ठोके चुकवले, तरीही अख्खं वानखेडे त्याच्यासाठी उठलं; कोण आहे 22 वर्षीय जेकब
Marathi March 06, 2026 03:25 PM

भारत विरुद्ध इंग्लीश T20 विश्वचषक 2026 जेकब बेथेल कोण आहे: टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत काल भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यात सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. या सामन्यासाठी भारताचा सलामीवीर संजू सॅमसनला (Sanju Samson) सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. (Ind vs Eng T20 World Cup 2026 Who Is Jacob Bethell)

भारतानं दिलेल्या 254 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. विशेष म्हणजे इंग्लंडच्या मधल्या फळीतील 22 वर्षांचा फलंदाज जेकब बेथेलच्या आक्रमक खेळीमुळे अनेकदा भारतीयांच्या हृदयाचे ठोके चुकवणारे क्षण आले. जेकब बेथेलनं शतक झळकावलं. मात्र तरीही इंग्लंडचे प्रयत्न सात धावांनी अपुरे पडले. जेकब बेथेलने 48 चेंडूत 105 धावा केल्या. जेकब बेथेल इंग्लंडला सामना जिंकून देईल असे वाटत असताना हार्दिक पांड्याने आणि संजू सॅमसनने त्याला धावबाद केले. जेकब बेथेल बाद झाल्यानंतर वानखेडेमधील सर्व प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यात वाजवत त्याच्या खेळीचं कौतुक केलं. (Ind vs Eng T20 World Cup 2026 Who Is Jacob Bethell)

कोण आहे जेकब बेथेल? (Who Is Jacob Bethell)

जेकब बेथेल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकवणारा इंग्लंडचा पहिला आणि जगातील 34 वा पुरुष खेळाडू ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये, त्याने या वर्षाच्या सुरुवातीला अ‍ॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 154 धावा केल्या. तो तिन्ही स्वरूपात शतके करणारा सर्वात जलद इंग्लंडचा फलंदाजही ठरला. बेथेलने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. जून 2021 मध्ये देशांतर्गत पदार्पण करणाऱ्या बेथेलला सप्टेंबर 2024 मध्ये इंग्लंड संघासाठी पदार्पण करण्याची संधी देण्यात आली. बेथेलने 6 कसोटी सामन्यांमध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 476 धावा, 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 603 धावा आणि 31 टी-20 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 697 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने कसोटी सामन्यांमध्ये 4, एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 आणि टी-20 सामन्यांमध्ये 8 विकेट्सही घेतल्या आहेत.

भारत आणि इंग्लंडचा सामना कसा राहिला? (Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026)

नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं 7 बाद 253 धावा केल्या होत्या. संजू सॅमसनला इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक यानं 15 धावांवर असताना जीवदान दिलं होतं. संजू सॅमसन यानं 89, इशान किशन यानं 18 चेंडूत 39 धावा केल्या. संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागिदारी केली.  शिवम दुबेनं 25 बॉलमध्ये 45, हार्दिक पांड्यानं 12 चेंडूत 27 धावा केल्या. तिलक वर्मानं 7 चेंडूमध्ये 21  धावा केल्या. भारतानं आजच्या डावात 19 षटकार मारले. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 7 बाद 246  धावा केल्या आणि भारतानं 7  धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

संबंधित बातमी:

Sakshi MS Dhoni Video Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026: बुमराहकडून एक टप्पा कॅच, साक्षी आनंदाने नाचू लागली; धोनीने लगेच खाली बसवले, रोहितही खळखळून हसला, VIDEO

Mohammad Amir Ind vs WI T20 WC 2026: वेस्ट इंडिज हरवणार, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जाणारच नाही बोलणारा मोहम्मद आमिर आता म्हणतो…

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.